शिवजयंतीनिमित्त जळगावात लक्षवेधी भव्य मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:51 PM2018-02-19T12:51:31+5:302018-02-19T13:01:12+5:30

शिवजयंती मिरवणुकीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह जळगावकरांचा सहभाग

in jalgaon shiv jayanti miravnuk | शिवजयंतीनिमित्त जळगावात लक्षवेधी भव्य मिरवणूक

शिवजयंतीनिमित्त जळगावात लक्षवेधी भव्य मिरवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलापासून मिरवणुकीस प्रारंभमाजी मंत्री सुरेशदादा जैन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनशहरातील विविध भागातून आलेल्या मिरवणुकीचा शिवतीर्थ मैदानावर समारोप

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सोमवारी सकाळी ९ वाजता शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला, तरुण व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षवेधी होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महापौर ललित कोल्हे, खासदार ए.टी.पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रा.डी.डी.बच्छाव, राष्ट्रवादीचे गफ्फार मलिक, अ‍ॅड.रवींद्र पाटील, विष्णू भंगाळे, ग.स.सोसायटी अध्यक्ष विलास नेरकर, लोकसंघर्ष मोर्चाची अध्यक्ष प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणूक जिल्हा क्रीडा संकुल, कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे शिवतीर्थ मैदानावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
मिरवणुकीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. रामेश्वर कॉलनीतून काढण्यात आलेली दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दाखल झाली.

Web Title: in jalgaon shiv jayanti miravnuk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.