मुंबईच्या पथकाकडून जळगावातील धान्य गोदाम सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 09:09 PM2018-01-23T21:09:06+5:302018-01-23T21:12:59+5:30

दोन पथकांकडून तपासणी : स्टॉक रजिष्टर व कागदपत्र घेतले ताब्यात

Jalgaon seal warehouse seal from Mumbai squad | मुंबईच्या पथकाकडून जळगावातील धान्य गोदाम सील

मुंबईच्या पथकाकडून जळगावातील धान्य गोदाम सील

Next
ठळक मुद्देपुरवठा आयुक्त व ग्राहक संरक्षण समितीच्या पथकाचा समावेशपथकाने केली धान्यसाठा व रजिष्टरमधील नोंदीची तपासणीमंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास केले गोडावून सील

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२३ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शासकीय गोदामात १०० कोटींचा धान्य घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर पुरवठा विभागाच्या मुंबई व ग्राहक संरक्षण समितीच्या दोन पथकांकडून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रेशनच्या धान्य गोडावूनची तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने दप्तर ताब्यात घेत गोदाम सील करण्याची कारवाई केली.
मुंबई येथील पुरवठा आयुक्त कार्यालय व ग्राहक संरक्षण समितीच्या दोन पथकांनी मंगळवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील धान्य गोदामाची तपासणी सुरु केली. या दरम्यान पथकाने गोदाम प्रमुखांकडून स्टॉक रजिष्टर तसेच आवक-जावक रजिष्टरच्या नोंदींची तपासणी केली. तर दुसºया पथकाने गोदामामध्ये येणारा धान्यसाठा तसेच वितरीत होणाºया मालाची माहिती तपासली. त्यानंतर दोन्ही पथकांनी दप्तर ताब्यात घेतले असून दप्तरातील नोंदी तसेच गोदामातील धान्य याची पडताळणी करण्यासाठी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोदाम सिल करण्याची कारवाई केली.

 मुंबई येथील पुरवठा आयुक्त कार्यालय व ग्राहक संरक्षण समिती अशा दोन पथकांनी मंगळवारी जळगावातील धान्य गोदामाची तपासणी केली. एका पथकाने धान्याचा साठा तर दुसºया पथकाने दप्तराची तपासणी केली. नोंदी व प्रत्यक्षसाठा याच्या पडताळणीसाठी पथकाने गोडावून सील केले आहे.
अमोल निकम,तहसीलदार, जळगाव.

Web Title: Jalgaon seal warehouse seal from Mumbai squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.