जळगावात ओव्हरटेकच्या नादात ट्रकच्या चाकाखाली येऊन तरूण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 09:08 PM2018-06-29T21:08:26+5:302018-06-29T21:10:39+5:30

महामार्गावरील हॉटेल आदर्शसमोरून जात असलेल्या ट्रकला विरूध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकीवरील भावंडांपैकी मागे बसलेला सुपडू गोकुळ कुंभार (वय-३१, रा़ पुनगाव, ता़ यावल) याचा तोल जाऊन ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला़ मात्र, ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने सुपडू हा बचावला, परंतू पाय व कान चिरडले जाऊन गंभीर जखमी झाला़

In Jalgaon, overcrowded tears came under the wheels of a truck and seriously injured | जळगावात ओव्हरटेकच्या नादात ट्रकच्या चाकाखाली येऊन तरूण गंभीर जखमी

जळगावात ओव्हरटेकच्या नादात ट्रकच्या चाकाखाली येऊन तरूण गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देआदर्श हॉटेल समोरील घटनाट्रकचालकाच्या प्रसंगावधानाने तरूण बचावलादुचाकीस्वार सुखरुप

जळगाव - महामार्गावरील हॉटेल आदर्शसमोरून जात असलेल्या ट्रकला विरूध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकीवरील भावंडांपैकी मागे बसलेला सुपडू गोकुळ कुंभार (वय-३१, रा़ पुनगाव, ता़ यावल) याचा तोल जाऊन ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला़ मात्र, ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने सुपडू हा बचावला, परंतू पाय व कान चिरडले जाऊन गंभीर जखमी झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी ३़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेत दुचाकीचालक दिपक गोकुळ कुंभार (वय-२९) यास काहीही झालेले नाही़
घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाल्यानंतर त्याने शहरात राहणाऱ्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली़ त्यानंतर चालक हा नातेवाईकांसह दुपारी पोलीस ठाण्यात हजर झाला. याठिकाणी त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली़

Web Title: In Jalgaon, overcrowded tears came under the wheels of a truck and seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.