जळगाव जि़प. सदस्य पतीची सीईओंना शिविगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:58 AM2019-07-21T00:58:33+5:302019-07-21T00:59:05+5:30

अधिकारी पैशांसाठी कामे करीत नसल्याचा आरोप

Jalgaon Jip Members get rid of the husband's CEO | जळगाव जि़प. सदस्य पतीची सीईओंना शिविगाळ

जळगाव जि़प. सदस्य पतीची सीईओंना शिविगाळ

Next

जळगाव : शिक्षिकेच्या बदलींसदर्भात विचारपूस करण्यासाठी गेल्यावर सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांना शिविगाळ केल्याचा प्रकार जिल्हा परिषदेत शनिवारी दुपारी घडला़ दरम्यान, ही फाईल खासदार उन्मेष पाटील यांच्या नातेवाईकांची असल्याची माहिती मिळाली़
मिळालेल्या माहितीनुसार खासदार उन्मेष पाटील यांचे शालक हे धरणगाव येथील रहिवासी आहेत, त्यांच्या पत्नी जळगाव महापालिका शाळेत शिक्षिका आहेत, त्यांना अपडाऊनचा त्रास होत असल्याने नियमानुसार त्यांची जिल्हा परिषद शाळेत बदली करून द्यावी, या कामासाठी ते सीईओंच्या दालनात आले होते, त्यावेळी हा प्रकार घडला.
हु आर यु म्हणताच संताप
शनिवारी जि़ प सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासोबत चंद्रशेखर अत्तरदे सीईओंची भेट घ्यायला त्यांच्या दालनात गेले़ यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांच्याशी ते चर्चा करीत होते. यावेळी त्यांनी फाईलसंदर्भात विचारपूस केली़ यावर सीईओंनी त्यांना हु आर यू हा प्रश्न विचारला यावरून संतप्त होत अत्तरदे कॅबीनच्या बाहेर आले व त्यांनी सीईओंना शिविगाळ केल्याची माहिती आहे़ यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी़ एस़ अकलाडे यांच्या दालनातही त्यांनी संताप व्यक्त केला़ सीईओ पाटील हे दहा ते पंधरा मिनिटातच जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीसाठी रवाना झाले़ फाईलवर स्वाक्षरी झालेली होती, मात्र, रिक्त जागेच्या पडताळणीसाठी फाईल पेंडीग होती़ अशी माहिती मिळाली़ दरम्यान, चंद्रशेखर अत्तरदे यांनी या आधिही जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात तसेच महापालिकेतही अशाच प्रकारे संताप व्यक्त केला होता़ दरम्यान, सीईओ डॉ़ पाटील हे सदस्यांना ओळखत नाहीत, त्यांना योग्य वागणूक देत नाहीत, तर सामान्य माणसांना न्याय कधी मिळणार असा सवाल अत्तरदे यांनी उपस्थित केला आहे़
मी मुंबईला आहे, मला या प्रकरणाची कसलीही कल्पना नाही, मात्र माहिती घेऊन
सांगतो -उन्मेष पाटील, खासदार
मतदार संघातील शिक्षिकेच्या बदलीसंदर्भातील फाईल वांरवार पाठपुरवा करूनही मार्गी लागत नाही, मतदार आम्हाला बोलतात़ अधिकाऱ्यांकडून सदस्यांना सन्मान दिला जात नाही, सीईओ मला विचारतात हु आर यू... आम्ही लोकांची कामे घेऊन येतो आणि पैशांसाठी हे आज करू उद्या करू... अशी टाळाटाळ करतात़ मग संताप होणारच, मी पाच दिवसांपासून त्यांना फोन केले, खासदारांनी स्वत: त्यांना फोन केला, तरीही काम होत नव्हते़
- चंद्रशेखर अत्तरदे.

Web Title: Jalgaon Jip Members get rid of the husband's CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव