जळगाव जिल्ह्यात ३७ गावांचे टँंकर झाले आठवडाभरात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:42 PM2019-07-16T12:42:10+5:302019-07-16T12:42:52+5:30

अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा

In Jalgaon District the tankers of 37 villages were closed in the week | जळगाव जिल्ह्यात ३७ गावांचे टँंकर झाले आठवडाभरात बंद

जळगाव जिल्ह्यात ३७ गावांचे टँंकर झाले आठवडाभरात बंद

Next

जळगाव : जिल्ह्यात पावसाने उशिराने का होईना हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळेच आठवडाभरात आणखी ३७ गावांचे ३५ टँकर बंद झाले आहेत. सध्या १४७ गावांना १२३ टँकर सुरू आहेत. तर अद्यापही २६९ गावांना २७८ अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती़ मोठ्या प्रमाणावर पाणी समस्येला शेकडो गावातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागले होते़ जून अखेरपर्यंत ही टंचाईची समस्या कायम होती़ गेल्या दोन महिन्यांपासून टँकरच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र होते़ मध्यंतरी आठवड्याला १४ टँकर वाढत होते़
मात्र आतापर्यंत सुमारे २१.६ टक्के पाऊस झाला असून या पावसामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे़
एरंडोल, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा टँकरमुक्त
जळगाव- ७ गावे ९ टँकर, जामनेर १२गावे १० टँकर, धरणगाव ४ गावे ४ टँकर, भुसावळ ६ गावे ६ टँकर, बोदवड २ गावे २ टँकर, पाचोरा ११ गावे १० टँकर, भडगाव १० गावे, ८ टँकर, चाळीसगाव २७ गावे ३२ टँकर, पारोळा १७ गावे ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
अमळनेर तहानलेलेच
यावर्षी १५ जुलैपर्यंत सर्वात कमी पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे़ अमळनेर तालुक्यात ९५ मिमी पावसाची नोंद आहे़ अशा स्थितीत अमळनेर ५१ गावे ३५ टँकर सुरू आहेत.

Web Title: In Jalgaon District the tankers of 37 villages were closed in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव