जळगाव जिल्ह्यात शेतक-याच्या अंगावर कोसळली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:58 PM2019-06-11T21:58:10+5:302019-06-11T22:00:28+5:30

शेतात कपाशीची लागवड करीत असताना अचानक आलेल्या वादळ वाºयापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या सुनील उर्फ पिंटू भगवान सोनवणे (३५) यांच्या अंगावर वीज कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी दापोरा, ता.जळगाव शिवारात घडली. या घटनेत सुनील हा गंभीर जखमी झाले असून दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत.

In Jalgaon district, the power of the plant collapsed | जळगाव जिल्ह्यात शेतक-याच्या अंगावर कोसळली वीज

जळगाव जिल्ह्यात शेतक-याच्या अंगावर कोसळली वीज

googlenewsNext
ठळक मुद्दे दापोरा येथील घटना शेतकरी गंभीर जखमी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव : शेतात कपाशीची लागवड करीत असताना अचानक आलेल्या वादळ वाºयापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या सुनील उर्फ पिंटू भगवान सोनवणे (३५) यांच्या अंगावर वीज कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी दापोरा, ता.जळगाव शिवारात घडली. या घटनेत सुनील हा गंभीर जखमी झाले असून दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हे आई निर्मला व पत्नी आशाबाई यांच्यासह मंगळवारी शेतात कपाशी लागवड करण्यासाठी गेले होते. दिवसभराचे काम अंतिम टप्प्यात असताना पाच वाजता जोरदार वादळ, वारा सुटून विजांचा कडकडाट झाला. पावसाच्याही हलक्या सºया कोसळल्या. या वादळ व वाºयापासून बचाव व्हावा म्हणून सुनील हे आई व पत्नीसह झाडाच्या आडोश्याला गेले. हातात मोबाईलही सुरुच होता, त्याचवेळी विज कोसळून ती सुनील यांच्या छातीला व पोटाला चाटून गेली. या घटनेत घाबरलेल्या पत्नी व आईने शेजारीला लोकांनी बोलावले. सुनील यांचे नातेवाईक शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नरेंद्र सोनवणे यांनी सुनील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रकृती चिंताजनक असली तरी धोका टळल्याची माहिती अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली.

Web Title: In Jalgaon district, the power of the plant collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.