ठळक मुद्देचोपडा येथे काळ्या फिती लावून निषेधपारोळा येथे नोटबंदीचे वर्षश्राद्धएरंडोल येथे काँग्रेसतर्फे बडविला ढोल

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.८ : केंद्रशासनातर्फे चलनातून ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बाद करीत करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणूस होरपळला गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. चोपडा, पारोळा, धरणगाव, अमळनेर व जळगाव येथे शासनाचा हा हुकुमशाही निर्णर्य काळा दिवस म्हणून साजरा करीत ठिकठिकाणी नोटबंदीचे वर्षश्राद्ध करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले.

चोपडा येथे काळ्या फिती लावून निषेध
चोपड्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. त्यानंतर काढण्यात आलेला मोर्चा शिवाजी चौका पासून मेनरोड मार्गे चावडी वरून तहसील कार्यालयावर नेला. याठिकाणी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीप सुरेश पाटील, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष राजाराम पाटील, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष वंदना पाटील, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजीव बाविस्कर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपाध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, सूतगिरणी संचालक भागवत पाटील, संचालक राजेंद्र पाटील, एनएसयूआय अध्यक्ष चेतन बाविस्कर उपस्थित होते.

पारोळा येथे नोटबंदीचे वर्षश्राद्ध
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी पारोळा येथे नोटबंदीचे वर्षश्राद्ध करीत नायब तहसीलदार एस. झेड. वंजारी यांना निवेदन दिले. जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, नगरसेवक रोहन मोरे, पं.स. उपसभापती अशोक पाटील, तालुका अध्यक्ष यशवंत पाटील, टिटवी सरपंच पाडुंरग पाटील, डॉ शांताराम पाटील, युवक अध्यक्ष मनोराज पाटील, जि प सदस्य हिम्मत पाटील कौस्तुभ सोनावने, दिगंबर पाटील, जीवन पाटील, पं. स. सदस्य राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सलीम पटवे उपस्थित होते.


धरणगावला काँग्रेसतर्फे निदर्शने
धरणगाव येथे तालुका काँग्रेस कमेटी तर्फे निदर्शने करुन केंद्र व राज्य सरकारचा नोट बंदी मुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचा निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. नायब तहसीलदार कर्वे यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस चे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी,शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, युवक अध्यक्ष विकास लांबोळी, जळगाव ग्रामीण चे अध्यक्ष चंदन पाटील, महेश पवार, डॉ.गोपाळ पाटील, प्रा.सम्राट परिहार, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष पटेल, मंगल पाटील, रामनाथ चिंधू पाटील, दिनकर पाटील, रामचंद्र पाटील, अनिल पाटील उपस्थित होते.

एरंडोल येथे काँग्रेसतर्फे बडविला ढोल
एरंडोल येथे काँग्रेसतर्फे नोटबंदीच्या निषेधार्थ ढोल बडविण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

जामनेरला युवा सेनेने गाजर वाटप करुन केला निषेध
जामनेर येथे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी गाजर वाटप करुन निषेध केला. नगर पालिका चौकात हा कार्यक्रम झाला. उपजिल्हाप्रमुख अँड. भरत पवार, अनिल चौधरी, मुकेश जाधव, जगदीश चौधरी, सुनिल पवार, राहुल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी जि.प.सदस्य संजय गरूड यांच्या नेतृत्त्वाखाली नोटबंंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात आले.

शेतकरी कृती समितीतर्फे निषेध
चोपडा येथे बुधवारी सकाळी दहा वाजता विश्राम गृहावर नोटबंदीची वर्षपूर्ती निमित्त सुकाणू समिती जळगाव व शेतकरी कृती समिती चोपडा यांच्यातर्फे दिनदर्शिकेवर एक हजार रुपयांची नोट चिपकवून त्यास फुलांची माळा चढविण्यात आली. प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे यांनी केले. आभार किरण राजपूत यांनी मानले. यावेळी शेतकरी कृती समिती अध्यक्ष तथा सुकाणु समिति सदस्य एस.बी. नाना पाटील, साखर कारखाना संचालक अ‍ॅड.एस.डी.सोनवणे , युवराज सोनवणे, विनायक सोनवणे, मधुकर पाटील , रवींद्र्र सोनवणे , बाळासाहेब पाटील, डॉ.अजय करंदीकर, रमेश शिंदे, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, चोसाका संचालक जितेंद्र पाटील , हर्षल सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.