जळगाव जिल्ह्यात जि.प.च्या ७७४ वर्ग खोल्या जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:03 PM2018-06-06T15:03:36+5:302018-06-06T15:03:36+5:30

जिल्हाभरातील १८०० जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ७७४ वर्ग खोल्या जीर्ण झालेल्या आहेत. या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या शाळा खोल्या उद्ध्वस्त करून नवीन खोल्यांची उभारणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

In Jalgaon district, 774 sq.km of the district is dilapidated | जळगाव जिल्ह्यात जि.प.च्या ७७४ वर्ग खोल्या जीर्ण

जळगाव जिल्ह्यात जि.प.च्या ७७४ वर्ग खोल्या जीर्ण

Next
ठळक मुद्दे३ कोटीचा निधी प्राप्तपावसाळ्यापूर्वी उपायोजनेची अपेक्षाशिक्षण सभापतींच्या तालुक्यात सर्वाधिक जीर्ण खोल्या

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.६ : जिल्हाभरातील १८०० जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ७७४ वर्ग खोल्या जीर्ण झालेल्या आहेत. या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या शाळा खोल्या उद्ध्वस्त करून नवीन खोल्यांची उभारणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे १८०० जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांमधील बहुतांश वर्ग खोल्या जीर्ण झाल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आय व्हॅल्युवेशनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील खोल्या जीर्ण झाल्याचे या सर्र्वेक्षणात आढळून आले.
दोन कोटी २५ लाखांचा निधी खर्च
जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २०१६/१७ या वर्षात दोन कोटी २५ लाखांचा निधी मंजुर करण्यात आला होता. शिक्षण विभागातर्फे या वर्गखोल्यांच्या कामासाठी हा निधी खर्च करण्यात आला. त्यानंतर २०१७/१८ या वर्षात ६३ वर्ग खोल्यांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या वाटपाचे नियोजन शिक्षण विभागातर्फे सुरु आहे.
९६ वर्ग खोल्यांचे काम पूर्ण
सर्वेक्षणानंतर सुमारे ९६ वर्ग खोल्यांचे काम पूर्ण झाल्याचे शिक्षणविभागातील सूत्रांनी सांगितले. यावर्षी नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी ५० लाखांचा अतिरिक्त निधी मंजुर करण्यात आला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची अपेक्षा
जून महिना सुरु झाल्याने पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी भडगाव तालुक्यातील एका शाळेची खोली पडली होती. त्यात सुदैवाने कुणी विद्यार्थी जखमी झाले नव्हते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने ज्या वर्गखोल्या जास्त धोकादायक आहेत त्यांना तत्काळ उद्ध्वस्त करून त्यांच्या जागी दुसऱ्या खोल्यांची उभारणी करावी अशी मागणी होत आहे.
जीर्ण झालेल्या खोल्यांमध्ये सर्वाधिक १२१ खोल्या या शिक्षण सभापती पोपट भोळे यांच्या चाळीसगाव तालुक्यात आहेत. त्यापाठोपाठ पाचोरा तालुक्यात ९१, चोपडा तालुक्यात ८१ वर्गखोल्या जीर्ण आहेत. तर यावल तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ तीन वर्गखोल्या जीर्ण आहेत.

Web Title: In Jalgaon district, 774 sq.km of the district is dilapidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.