जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 08:04 AM2018-07-20T08:04:00+5:302018-07-20T08:04:14+5:30

नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखीव

Jalgaon: Counting of votes today for Muktainagar Nagar Panchayat | जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी

जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी

जळगाव :  भाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार २० रोजी होत आहे. यासाठी मोठी उत्सुकता लागून आहे. 

नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखीव आहे. यासाठी तीन उमेदवार तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात आहेत. तहसील कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (20 जुलै) सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सकाळी १०. १५ वाजता पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. 

नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या नजमा इरफान तडवी, शिवसेनेच्या ज्योत्स्ना दिलीप तायडे  आणि काँग्रेसच्या माधुरी आत्माराम जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी रविवार १५ रोजी ६५ टक्के मतदान झाले होते. भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे १७ जागा लढविल्या. पक्षांच्या निवडणूक चिन्हावर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे.
 

Web Title: Jalgaon: Counting of votes today for Muktainagar Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.