जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगाराने फोडले डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:54 PM2017-08-22T12:54:43+5:302017-08-22T12:55:44+5:30

धिंगाणा : पोलिसांना पैसे देवूनही कारवाई केल्याने संताप

In the Jalgaon City Police Station, the criminals broke the head | जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगाराने फोडले डोके

जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगाराने फोडले डोके

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 - आपल्यावर पोलिसांनी कारवाई करु नये यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचा:यांना तीन हजार रुपये दिले, तरीही सीआरपीसी 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने अजीज रशिद पठाण (वय 22, रा. गेंदालाल मील, जळगाव) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पोलीस ठाण्यातच संताप व्यक्त करुन भींतीवर डोके आपटले.  हा प्रकार पाहून पोलिसांमध्येही धडकी भरल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पैसे मागितल्याच्या आरोपाचा पोलिसांनी इन्कार केला आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडे बारा वाजता घडली.

Web Title: In the Jalgaon City Police Station, the criminals broke the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.