जळगाव येथून साडे आठ लाखाच्या डाळीची विल्हेवाट लावणा-या नवी मुंबईच्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 09:09 PM2018-03-18T21:09:56+5:302018-03-18T21:09:56+5:30

दालमीलमधून तयार झालेल्या साडे आठ लाख रुपये किमतीची हरभरा डाळीची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अमीतकुमार गोविंद भानुशाली व ठाणाराम भवरलाल पवार (दोन्ही रा.नवी मुंबई) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अकोला येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Jalgaon arrests eight and eight lacs of Dalis in Navi Mumbai | जळगाव येथून साडे आठ लाखाच्या डाळीची विल्हेवाट लावणा-या नवी मुंबईच्या दोघांना अटक

जळगाव येथून साडे आठ लाखाच्या डाळीची विल्हेवाट लावणा-या नवी मुंबईच्या दोघांना अटक

Next
ठळक मुद्देअकोला येथून घेतले ताब्यात  अन्य दोन जण फरार अकोला येथे दाखल आहे गुन्हा

आॅनलाईन लोकमत
जळगाव : दालमीलमधून तयार झालेल्या साडे आठ लाख रुपये किमतीची हरभरा डाळीची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अमीतकुमार गोविंद भानुशाली व ठाणाराम भवरलाल पवार (दोन्ही रा.नवी मुंबई) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अकोला येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
राजेश ओमप्रकाश अग्रवाल (रा.सदगुरु नगर, आयोध्या नगर, जळगाव) यांची औद्यागिक वसाहतीत सेक्टर क्र.एच.११ मध्ये पुष्पा पल्सेस नावाची दालमिल आहे. अमीतकुमार फर्मचे मालक अमीत गोविंद भानुशाली व गोविंद  हे दोन्ही जण अग्रवाल यांचा माल कमिशनवर विक्री करतात. त्यांनी २४ जानेवारीपासून तर आजपर्यंत ८ लाख ४६ हजार ५ रुपये किमतीचे हरभरा डाळीचे ३० किलो वजनाचे ६७० कट्टे वाशी येथील अतुल अ‍ॅग्रोच्या मालकाला विक्री केला होता. मात्र समर्थ एन्टरप्रायजेसच्या मालकामार्फत सर्वांनी या मालाची परस्पर विक्री करुन अग्रवाल यांची फसवणूक केली.याप्रकरणी एमआयडीसी पोलसात अमीत, गोविंद भानुशाली, ठाणाराम पवार व महेश मेघजी भानुशाली या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे तपासाधिकारी सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी मुंबई येथे जाऊन संशयितांची चौकशी केली असता त्यातील अमीतकुमार व ठाणाराम हे दोन्ही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अकोला कारागृहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वंजारी, विजय नेरकर व जितेंद्र राजपूत यांचे पथक अकोला येथे गेले होते. शनिवारी रात्री या दोघांना ताब्यात घेऊन जळगावात आणण्यात आले.

Web Title: Jalgaon arrests eight and eight lacs of Dalis in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव