अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:16 AM2019-07-21T00:16:45+5:302019-07-21T00:17:20+5:30

शहर परिसर व जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच

Invalid sand transport officer | अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी

अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी

Next

जळगाव : शहर परिसर व जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरूच असून बांभोरी प्र.चा. येथे गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे नऊ ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले तर दोन ट्रॅक्टर चालकांनी पळवून नेले. यानंतर दोन दिवसात पुन्हा दापोरा येथूनही महसूल पथकाच्या ताब्यातून चालकाने वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले.
वाळू लिलावामध्ये गटाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनीच बांभोरी नजीकच्या गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार धरणगाव तहसील कार्यालयात केली होती. सोबतच परिसरातील नागरिकांच्याही तक्रारी होत्या. त्यानुसार गुरुवार, १८ जुलै रोजी सकाळी सात वाजताच महसून पथकाने बांभोरी, ता. धरणगाव येथील सिद्धी विनायक नगर शेजारी गिरणा नदी पात्रात पोहचले असता तेथे ११ ट्रॅक्टरव्दारे वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. महसूलचे पथक नदी पात्रात पोहचताच त्यांना पाहून चालकांनी एम.एच. १९, एएन - १९६२ व एमएच. १९, पी. ०३९२ हे दोन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. उर्वरित ९ ट्रॅक्टर या पथकाने ताब्यात घेतले. त्या सर्वांचा पचंनामा करून ते धरणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. वाळू वाहतूकदार वाहने पळवून नेत असल्याच्या घटना पाहता जळगावातून दंगा नियंत्रण पथक नदीपात्रात पाठवावे लागले. त्या वेळी पोलीस बंदोबस्तामुळे वाळू चोरट्यांना कोणताही विरोध करता आला नाही. तरीदेखील दोन ट्रॅक्टरचालकांनी दोन ट्रॅक्टर पळवून नेले. अवैध वाळू उपशाची तीन आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. या पूर्वी १ जुलै रोजी विदगाव येथे तापी नदी पात्रातून वाळू भरणाऱ्या ९ ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते घेऊन महसूलचे कर्मचारी येत असताना त्यातील सहा ट्रॅक्टरच्या मालक व चालकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांना ढकलून दिले व ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. त्या वेळी कारवाई करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी वाळू उपसा करणाºयांना रोखण्यासाठी ग्रामस्थ थेट गिरणा नदी पात्रात उतरले होते. त्यावेळी वाळू उपशास विरोध करीत वाळूने भरलेले विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत असताना वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर घेऊन पसार झाले होते. आता पुन्हा २० रोजी दापोरा येथे ग्रामस्थांनी पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले.

Web Title: Invalid sand transport officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव