हुशार मंडळींना कोणी पुढे गेलेले सहन होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:52 AM2019-03-25T10:52:13+5:302019-03-25T10:52:20+5:30

 पत्रकार परिषदेत खासदार ए.टी.पाटील यांनी पक्षांतर्गंत विरोधकांवर साधला निशाणा

Intelligent people do not tolerate anybody who has gone ahead | हुशार मंडळींना कोणी पुढे गेलेले सहन होत नाही

हुशार मंडळींना कोणी पुढे गेलेले सहन होत नाही

Next

पारोळा : जिल्ह्यात काही मंडळी हुशार आहेत, त्यांना कोणी पुढे गेलेले सहन होत नाही आणि मग अश्या पद्धतीने ( तिकीट कापून) मागे खेचण्याचे काम करतात, संघ परिवार देखील माझ्यासोबतच होता, पण असे का झाले हे मला सांगता येणार नाही, असे भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांनी म्हटले आहे.
तिकिट कापल्यानंतर खासदार पाटील यांनी रविवारी सायंकाळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेला अमळनेरचे माजी आमदार बी.एस.पाटील, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सुरेंद्र बोहरा, तालुका अध्यक्ष अ‍ॅड.अतुल मोरे, शहर अध्यक्ष मुकुंदा चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभेच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आपली भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे खासदार .पाटील यांनी सांगितले.
पारोळा तालुका अध्यक्ष अतुल मोरे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राचे संघटन मंत्री पुराणिक यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे सांगितले.
दरम्यान शनिवारी आमदार स्मिता वाघ यांनी पारोळ्यात येऊन भेट घेतल्यावेळी ए.टी. पाटील यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्याची चर्चा होती.
स्मिता वाघ यांनी घेतली भेट
४आमदार स्मिता वाघ यांनी शनिवारी संध्याकाळी १५ ते २० मिनिटे आपल्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सहकार्य करा, असे आवाहन केले. आपले तिकिट कापल्यानंतर काही समर्थकांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. मात्र यावेळी आमदार स्मिता वाघ यांच्या विरोधात घोषणाबाजी वगैरे न करता केवळ चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
४यावेळी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी ए.टी.पाटील यांच्यासारख्या सक्षम खासदारांचे तिकीट कापले गेले याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. याबाबत आम्ही जिल्हा कमिटी व वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजून ही वेळ गेलेली नाही जसे क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच असते तसेच राजकारणात देखील शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते असे सांगितले.

Web Title: Intelligent people do not tolerate anybody who has gone ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.