तामसवाडी गावाची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:02 PM2019-02-01T22:02:36+5:302019-02-01T22:03:49+5:30

मौजे वरखेडे-लोंढे धरण प्रकल्पातर्गत पुनर्वसन होणाºया तामसवाडी गावाला शुक्रवारी दुपारी १२ वाजता अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट दिली. पाहणी करताना ग्रामस्थांशी चर्चाही केली.

Inspection by Additional District Collectors of Tamaswadi village | तामसवाडी गावाची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

तामसवाडी गावाची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देपुनर्वसन : वरखेडे-लोंढे प्रकल्पमध्यंतरीत ग्रामस्थांनी बंद पाडले होते काम

चाळीसगाव, जि.जळगाव : मौजे वरखेडे-लोंढे धरण प्रकल्पातर्गत पुनर्वसन होणाºया तामसवाडी गावाला शुक्रवारी दुपारी १२ वाजता अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट दिली. पाहणी करताना ग्रामस्थांशी चर्चाही केली.
तामसवाडी हे गाव वरखेडे-लोढे प्रकल्पामुळे पुनर्वसित होणार आहे. त्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. दोन तास अधिकाºयांनी पुनर्वसन स्थळांची पाहणी करताना गावकºयांशी संवादही साधला.
यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार कैलास देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पी.आर. मोरे, उपअभियंता सचिन पाटील आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी अधिकाºयांसमोर आपल्या समस्या मांडल्या. अहवाल जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे.
अधिकाºयांची माणसुकी : अत्यवस्थ रुग्णाचे वाचविले प्राण
अपर जिल्हाधिकारी गाडीलकर, तहसीलदार कैलास देवरे हे अधिकाºयांसमवेत तामसवाडीहून दुपारी चाळीसगावकडे येत होेते. तेव्हा देवळी गावानजीक अपघातग्रस्त अत्यवस्थ विजय पाटील यांना गाडीत टाकून चाळीसगावी उपचारासाठी दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने विजय पाटील यांचे प्राण वाचले. अधिकाºयांनी दाखवलेली माणुसकी व समयसुचकता यांचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही दिवसभर कौतुकाचा वर्षाव सुरू होता. जखमी विजय पाटील शिवणी, ता.भडगाव येथील असून ते दुचाकीवरुन जात असताना देवळी गावाजवळ त्यांचा अपघात झाला होता. महसूल विभागातील संदीप राजपूत, प्रवीण मोरे यांनी विजय पाटील यांच्या नातेवाईकांशी तातडीने संपर्क करुन त्यांना बोलावून घेतले.
तामसवाडी येथील ग्रामस्थांनी मध्यंतरी वरखेडे-लोंढे प्रकल्पाचे काम आंदोलन करुन बंद पाडले होते. यानंतर पोलीस बंदोबस्तात हे काम पुन्हा सुरू झाले. याचवेळी शासनाने पुनर्वसनाबाबत लवकरच पाहणी करण्यासह ग्रामस्थांंशी चर्चा करण्यात येईल, असे अश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी अपर जिल्हाधिकाºयांनी तामसवाडी गावाची पाहणी केली.

Web Title: Inspection by Additional District Collectors of Tamaswadi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.