मुडी येथे दूषित पाण्यातून ९० जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 08:43 PM2019-07-20T20:43:08+5:302019-07-20T20:43:21+5:30

मुडी प्र.डा., ता.अमळनेर : मुडी येथे मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यातूनच गावातील सुमारे ...

Infectious water disrupts 90 people in Mudi | मुडी येथे दूषित पाण्यातून ९० जण बाधित

मुडी येथे दूषित पाण्यातून ९० जण बाधित

Next




मुडी प्र.डा., ता.अमळनेर : मुडी येथे मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यातूनच गावातील सुमारे ९० जणांना पोटदुखी व हगवणीची लागण झाली आहे.
मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली. त्यात ठिकठिकाणी गटारी फुटलेल्या, पिण्याच्या पाईपलाईन गळक्या असून तेथेच गटारी आढळून आल्या. गावातील जवळपास ८० ते ९० जणांना हगवण व पोटदुखीचा त्रास होत आहे. काही रुग्ण खासगी दवाखान्यात, तर काही मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. काही बेटावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे येथे दाखल होऊन उपचार घेत आहेत. रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली असता गावविहिरीलगत असलेले व्हॉल्व्ह लिकेज आढळून आले. गावात पाणी पुरवठा करणारी येणारी मुख्य पाईपलाईन लिकेज आहे. गटारीचे पाणी पाईपलाईनच्या शुद्ध पाण्यात मिसळून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. त्यात सर्व नळांना तोट्या बसवून , व्हॉल्व्ह गळती बंद करून पाण्याच्या टाकीजवलील कचरा स्वच्छतेचे निर्देश दिले आहेत.
ही गंभीर बाब असून ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामसेवकाचे दुर्लक्ष
गावात साथरोगाची लागण झाली आसताना ग्रामसेवक मात्र जळगावी येथे वास्तव्यास जाऊन बसले आहेत. आठवड्यातून एक ते दोन दिवस ते हजेरी लावून परत निघून जातात, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.

Web Title: Infectious water disrupts 90 people in Mudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.