ठळक मुद्देफिडे मानांकित खेळाडूंचा सहभागभारत आमलेचा चंद्रशेखर देशमुखवर विजय

लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोटर््स अकॅडमीने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दिवशी चार फेºयात रोहित पाटील, भारत आमले आणि विवेक तायडे यांनी आघाडी घेतली. 
ग्रॅण्ड मास्टर प्रवीण ठिपसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद््घाटन कांताई सभागृहात शनिवारी सकाळी करण्यात आले. या स्पर्धेत जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधून ६० खेळाडू सहभागी झाले आहेत. यातील २० खेळाडू फिडे मानांकित आहेत. या स्पर्धेच्या एकूण ८ फेºया होणार आहेत. त्यातील पहिल्या चार फेºया शनिवारी घेण्यात आल्या. चौथ्या फेरीअखेर पहिल्या पटावर भारत आमले याने चंद्रशेखर देशमुख यांच्यावर मात केली. तर रोहित पाटील याने अजय परदेशी याचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. तिसºया पटावर काळ्या मोहरांनी खेळताना विवेक तायडे याने नंदुरबारच्या वैभव बोरसे याचा पराभव केला.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी हे देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी चारपैकी दोन फेºयांत विजय मिळवला. 


निकाल पुढील प्रमाणे 
चौथी फेरी - भारत आमले वि.वि. चंद्रशेखर देशमुख, रोहित पाटील वि.वि. अजय परदेशी, विवेक तायडे वि.वि. वैभव बोरसे, अरविंद तायडे वि.वि. ऋषिकेश सोनार,  तेजस तायडे वि.वि. निकिता चव्हाण