पिकांचे अवशेष वापरून सुपिकता वाढवा

By ram.jadhav | Published: January 12, 2018 10:33 PM2018-01-12T22:33:03+5:302018-01-12T22:35:10+5:30

डॉ. हरिहर कौसडीकर यांचा सल्ला : दीर्घकाळ एकाच पिकाने सुपिकता घटली; जिवाणूंचाही नियमित वापर करावा

Increase fertility by using crop residues | पिकांचे अवशेष वापरून सुपिकता वाढवा

पिकांचे अवशेष वापरून सुपिकता वाढवा

Next
ठळक मुद्दे जळगावात केळी परिसंवादात केले शेतकºयांना मार्गदर्शनकेळी उत्पादकांना घ्यावी लागणार काळजीजिवाणू आणि टाकाऊ पदार्थांचा करावा शेतकºयांनी वापर

आॅनलाईन लोकमत, दि़ १२ जळगाव -

राम जाधव
लोकमत संवाद
जळगाव : सतत संकरित व जास्त उत्पादन देणाºया वाणांच्या बियाण्यांचा वापर केला जात आहे़ त्यामुळे जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्यांचे असंतुलन झालेले आहे़ त्यासाठी जिवाणंूचा वापर केला जावा़ पीक अवशेष जमिनीत गाडावे़ हिरवळीच्या पिकांची लागवड करावी व रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा़ असा सल्ला महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषदेचे संचालक (पुणे) डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिला़
कृषी क्षेत्रातील होणारे बदल आणि संशोधन तसेच कृषी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठीच्या संधी याबाबत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला़ भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची (तामिळनाडू) व अ‍ॅग्रीसर्च प्रा. लि. यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित ‘निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी हायटेक तंत्रज्ञान’ या विषयावरील परिसंवादासाठी ते जळगावात ते आले होते़ यावेळी त्यांनी ही माहिती दिली़
प्रश्न : शेतकºयांनी मातीपरीक्षण का करावे?
४उत्तर : सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांनी मातीपरीक्षण करणे आवश्यक आहे़ योग्य मातीपरीक्षणानंतरच गरजेच्या खतांचा वापर करता येतो़ सर्व अन्नद्रव्यांच्या तपासणीअंती आवश्यक त्याच खतांची योग्य मात्रा वापरल्याने कमी खर्चात चांगले उत्पादन शेतकºयांना घेता येते़ विनाकारण व जास्तीचा खर्च होत नाही़
प्रश्न : अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन कसे करावे?
४उत्तर : कोणत्याही पिकाला एकूण १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते़ त्यातील आॅक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन ही ३ मूलद्रव्ये निसर्गत: उपलब्ध असल्याने पिकांना मिळतात़ इतर १४ अन्नद्रव्ये आपल्याला जमिनीत किंवा पिकांना फवाºयातून द्यावी लागतात़ भारतातील बहुतेक भागातील जमिनीत मुख्यत्वे करून नायट्रोजन, फॉस्फरस, गंधक, जस्त, लोह आणि बोरॉनची अधिक कमतरता दिसून येते़ हिवाळ्याच्या दिवसात थंड वातावरणामुळे पिकांची वाढ थांबते़ त्यामुळे या काळात केळी उत्पादकांनी झिंक-सल्फेटचा एकरी २ किलो वापर करावा़
प्रश्न : केळी पिकासाठी काय सल्ला द्याल ?
४उत्तर : जळगाव जिल्ह्याचे मुख्य नगदी पीक केळीचे आहे़ रावेर, यावल आणि मुक्ताईनगर भागातील जमिनीची सुपीकता घटत आहे़ सतत एकच पीक दीर्घकाळ घेतल्याने जमिनीतील सेंद्रीय कर्ब कमी झाले आहे़ म्हणूनच जमिनीतील क्षार वाढून उत्पादन घटत आहे़ यासाठी स्वस्तात पर्याय म्हणजे शेतातीलच केळीचे टाकाऊ हिरवे पदार्थ जमिनीत सडवणे, केळीचे सर्व भाग उपयोगी आहेत़ त्यांचा वापर केला जावा़ यातून मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय खते मिळतात़ विशेषत: हिवाळ्यामध्ये केळी उत्पादकांनी केळीची वाढ थांबणार नाही, यासाठी झिंक-सल्फेटची मात्रा जमिनीतून आणि फवारणीतूनही जास्त वापरावी़ सर्व अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावीत़ तरच चांगली रास केळीमध्ये मिळविता येते़
प्रश्न : मुख्य अन्नद्रव्ये कोणती ?
४उत्तर : नायट्रोजन, पोटॅशिअम आणि फॉस्फरस (एनपीके) ही ती मुख्य अन्नद्रव्ये म्हणून आतापर्यंत सांगितली जात होती़ मात्र गेल्या काही वर्षाच्या अभ्यासाअंती लक्षात आले की, गंधक (सल्फर) हे सुद्धा भारतातील जमिनीत कमी असलेले व पिकांना आवश्यक असलेले एक महत्त्वाचे मूलद्रव्य आहे़ त्यामुळे आता मुख्य अन्नद्रव्यांची संख्या ४ झाली आहे़ या गंधकाचा योग्य प्रमाणात वापर व्हावा म्हणून शासनाने त्याचाही मुख्य अन्नद्रव्यात समावेश करून दाणेदार खतांमध्ये ते मिश्रीत केले आहे़ त्यामुळे मिळणाºया रासायनिक खतांमध्येच आता सल्फेटयुक्त खतांचा पुरवठा केला जात आहे़
प्रश्न : कृषी शिक्षणाला चांगले दिवस आलेत का?
४उत्तर : कृषी शिक्षणाला आता नक्कीच चांगले दिवस आलेले आहेत़ महाराष्ट्रात १९० कृषी महाविद्यालये आहेत़ पैकी ३४ शासकीय तर १५६ विनाअनुदानित आहेत़ दरवर्षी या महाविद्यालयांमधून सरासरी १५ हजार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात़ तर २०० कृषी विद्यालयांतून १२ हजार विद्यार्थी कृषी पदविका घेतात़ पदवी घेणाºया विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव म्हणून कौशल्य विकासाप्रमाणे पदवीचे शिक्षण घेताना शेवटच्या वर्षातील सहा महिने प्रत्यक्ष अनुभव देण्यात येत आहेत़ यामध्ये पशुपालन व चिकित्सानुभव, मृदा चाचणी, संरक्षित भाजीपाला शेती, उत्पादन, नियोजन, विक्री-व्यवस्था, दुग्धव्यवसाय, शेळीपालन असे शेतीविषयक व शेतीपुरक व्यवसाय आणि कामांची माहिती व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे़
प्रश्न : कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा मिळाला काय?
४उत्तर : होय, आता कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा मिळालेला आहे़ त्यामुळे या अभ्यासक्रमात विविध व्यवसायांची माहिती मिळवून विद्यार्थी शेतीपूरक व्यवसाय करतील, म्हणून त्यांना कार्यानुभवाचे शिक्षण देत आहोत़ त्यातूनच आता या विद्यार्थ्यांना बँकेकडून कर्जेही उपलब्ध होत आहेत़ तसेच या कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांना बँक आणि विमा क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत़
प्रश्न : जमिनीची सुपिकता कशी टिकवावी?
४उत्तर : संकरित व जास्त उत्पादन देणाºया वाणांच्या बियाण्यांचा वापर केल्यामुळे आपल्या सुपीक जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अशा सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडले आहे़ त्यासाठी शेतकºयांनी आता रायझोबियम, अझेटोबॅक्टर, पीएसबी या जिवाणंूचा वापर नियमितपणे करावा़ यामुळे शेतकºयांचा खर्चही कमी होईल़ तसेच सेंद्रीय कर्ब म्हणून पीक अवशेष जमिनीत गाडावे़ हिरवळीच्या पिकांची लागवड शेतकºयांनी करावी़ तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा़ शेणखत, लेंडीखत, गांडूळखत, जिवामृत अशा सेंद्रीय खतांचा वापर वाढवला पाहिजे़

 

Web Title: Increase fertility by using crop residues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.