जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:34 PM2017-11-24T12:34:14+5:302017-11-24T12:40:26+5:30

घरचा आहेर: लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष पांडे यांची खंत

Ignore Jayprakash Narayan by BJP Government | जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा

जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा

Next
ठळक मुद्देसन्मानाच्या विषयावर सरकार गंभीर- गिरीश महाजनप्रश्न मार्गी लागेल- एकनाथराव खडसे
गाव- लोकनायक जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा होत आहे, अशी खंत अ. भा. लोकतंत्र सेनानी संघाचे प्रांताध्यक्ष आणि रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयप्रकाश पांडे (नागपूर) यांनी येथे व्यक्त केली. गुरुवारी 23 रोजी सकाळी 11 वाजता येथील आयएमए सभागृहात लोकतंत्र सेनानी संघातर्फे मीसा राजबंदी व सत्याग्रही कार्यकत्र्याचा मेळावा आयोजित केला होता. या उत्तर महाराष्ट्रस्तरीय मेळाव्यात पांडे बोलत होते. स्वागताध्यक्ष आमदार सुरेश भोळे हे होते. व्यापीठावर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे, सेनानी संघाचे प्रांत संघटक सुरेशराव सायखेडकर, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार बाळासाहेब सानप (नाशिक) यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी पांडे म्हणाले की, जे लोक आणीबाणी विरुद्ध जेल मध्ये गेले. ते जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रेरीत झाले होते. हुकूमशाही विरुद्ध लढा देत लोकशाहीसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. त्या सर्व मीसा राजबंदी सत्याग्रहींना देशातील स्वातंत्र्य लढय़ातील सैनिकांप्रमाणे सन्मान व मानधन दिले जावे अशी मागणी आहे. मात्र आपल्या विचारांचे भाजपाचे सरकार येवून तीन वर्षे उलटली तरी मागणी मार्गी लागेली नाही. यामुळे या सरकारकडून जयप्रकाश नारायण यांची उपेक्षा होत आहे, अशी खंत व्यक्त करीत इतर सात राज्यात मीसा राजबंदी सत्याग्रहींना देशातील स्वातंत्र्य लढय़ातील सैनिकांप्रमाणे सन्मान करुन मानधन दिले जात असल्याचाही उल्लेख केला. तर गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे आभार मानत तातडीने यावर निर्णय चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. याच विषयावर सांगली येथे 26 रोजी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सन्मानाच्या विषयावर सरकार गंभीर- गिरीश महाजनआणीबाणीच्या काळात अनेकांनी लढा दिला म्हणूनच लोकशाही जिवंत राहिली अन्यथा आज वेगळे चित्र दिसले असते. त्याकाळी जे लोकतंत्र सेनानींनी धाडस दाखवले त्यामुळे हळूहळू विचारांच प्रसार होत आज आपले सरकार आले तसेच छोटे कार्यकर्तेही मंत्री झाले. याची जाणीव सरकारला असून लोकतंत्र सेनानींचा योग्य सन्मान केला जाईल व मानधनही दिले जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल असून आपला पाठपुरावा सुरु असून लवकरच चांगला निर्णय लागलेला दिसेल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वस्त केले. प्रश्न मार्गी लागेल- एकनाथराव खडसेदेशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक चांगल्य योजना आणल्या व धाडसी निर्णयही घेतले परंतु हळू हळू त्यांच्यात हुकूमशाही वृत्ती येत गेली. याचाच परिपाक आणिबाणीत झाला. याविरुद्ध अनेकांनी मोठय़ा हिमतीने जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला. जेलमध्ये गेल्याने अनेकांच्या नोक:या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. असा त्याग करणारे लोकतंत्र सेनानी यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्वकीयांविरुद्ध आंदोलन पुकारले. स्वातंत्र सेनानींनी परकीयांविरूद्ध आंदोलन छेडले होते. त्यामुळे लोकतंत्र सेनानी यांचे कार्यदेखील जवळपास त्याच तोडीचे असल्याने आपण मुख्यमंत्र्यांकडे यासर्वाना सवलती मिळाव्या, मानधन मिळावे अशी मागणी केली आहेश अशी माहिती देत आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. व हा प्रश्न मुख्यमंत्री मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक उदय भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विश्वास कुलकर्णी यांनी केले. यावेळी माजी आमदार धरमचंद चोरडिया, लखन भतवाल, मदनलाल मिश्र (धुळे) यांच्यासह सर्व सत्याग्रहीचा सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानी यांच्या आठवणींवरील पुस्तक काढण्याचे यावेळी ठरले.

Web Title: Ignore Jayprakash Narayan by BJP Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.