मानसिक व शारीरिक छळातून पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:37 AM2019-03-15T00:37:08+5:302019-03-15T00:37:21+5:30

पत्नी कोमलने दिला जबाब

Husband's blood from mental and physical persecution | मानसिक व शारीरिक छळातून पतीचा खून

मानसिक व शारीरिक छळातून पतीचा खून

googlenewsNext

नेरी, ता. जामनेर : पतीकडून वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पतीचा खून करण्याचे अमानुष कृत्य आपल्या हातून घडल्याची माहिती पतीच्या खुनात आरोपी असलेल्या कोमल पवार हिने जामनेर पोलिसांना दिली. कोमल पवार हिला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिची जळगाव येथे उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
३ मार्च रोजी संदीप पवार यांचा पत्नी कोमल हिने अतिशय अमानुषपणे खून केला होता. त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर बुधवार, १३ मार्च रोजी तिला जिल्हा रुग्णालयातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर जामनेर न्यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याने पोलिसानी तिची कसून चौकशी केली असता गेल्या अनेक दिवसांपासून पती संदीप हे आपणास नेहमी मारहाण करून मानसिक त्रास देत होते. त्यांची तिसरे लग्न करण्याची इच्छादेखील त्यांनी बोलून दाखवली होती त्यामुळे राग अनावर होऊन सदरची घटना घडल्याचे कोमलने सांगितल.
कोमल सोबत संदीपचे हे दुसरे लग्न होते. याआधी जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील मुलीशी २०१७मध्ये त्याचे लग्न झाले होते. मात्र काही दिवसातच पहिल्या पत्नीला फारकती दिली होती. त्यानंतर मे २०१८मध्ये तालुक्यातीलच मोहाडी येथील कोमलशी संदीपचा विवाह झाला होता.
कोमल सात महिन्यांची गरोदर असताना लग्नाला एक वर्षदेखील पूर्ण होत नाही तो पर्यंत पतीची तिसऱ्या लग्नाची इच्छा पाहून कोमल मनातल्या मनात खचत गेली आणि आपल्या होणाºया बाळाच्या काळजी पोटी अस्वस्थ होऊ लागली होती, अशी माहिती मिळाली. याप्रकरणी अजून काही नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
घटनेच्या दिवशी पुन्हा याच विषयावरून दोघांमध्ये वाद झाला आणि कोमलने आपल्या पतीला धडा शिकवण्याचे ठरवले. खुनाच्या आदल्या रात्री वाद झाल्याने आपण आपल्या खोलीतून निघून गच्चीत झोपलेल्या सासू सासऱ्यांकडे गेले असता ते झोपलेले होते. याठिकाणी आपण काही वेळ सासूचे पाय दाबत असताना गच्चीत चूल मांडलेला दगड (पेव्हर ब्लॉक) पडलेला दिसला. थोड्या वेळाने तो पेव्हर ब्लॉक सोबत आपल्या खोलीत आणला व पती झोपल्याचे पाहून संतापात हल्ला केला अशी हकीकत कोमलने सांगितली.

Web Title: Husband's blood from mental and physical persecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव