वरणगाव येथे वृक्षतोडीमुळे बगळ्यांच्या दीडशे पिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:57 AM2018-08-19T01:57:07+5:302018-08-19T02:00:34+5:30

शरंंगगार जातीच्या वृक्षाची कत्तल केल्यामुळे या वृक्षावर वस्ती केलेल्या गायबगळे आणि पाणकावळ्यांच्या दिडशे पिलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पक्षीप्रेमी चातक टिम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोनशेच्यावर पक्षी वाचवण्यात आले.

 Hundreds of thugs die due to tree trunk in Varangaon | वरणगाव येथे वृक्षतोडीमुळे बगळ्यांच्या दीडशे पिलांचा मृत्यू

वरणगाव येथे वृक्षतोडीमुळे बगळ्यांच्या दीडशे पिलांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजखमी पिलांवर केले पक्षीप्रेमींनी उपचारवृक्षतोडीच्या चौकशीची पालिकेकडे मागणी

खिर्डी, ता रावेर जि. जळगाव : वरणगाव येथील रावजी बुवा समाधी परिसरातील शारंगगार जातीच्या झाडाची अज्ञात इसमाने शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास कत्तल केल्याने झाडावरील असलेले गायबगळे व पाणकावळ्यांची दिडशे छोटी पिल्ले व त्यांची अंडी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. दरम्यान, चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या पक्षीमित्रांना माहिती मिळताच सदर ठिकाणी धाव घेवून त्यांनी दोनशेवर छोटया पिलांना वाचविण्यात यश मिळविले.
परिसरातील नागरिकांना पक्षांचा त्रास होत होता, या हेतुने हे कृत्य केल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याबाबत पक्षीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर पक्षी वाचविण्यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली
व मदतकायार्साठी लक्ष्मीकांत नेवे, अपर्णा नेवे, सत्यपालसिंग राजपूत, अतुल वाणी, सुरेश ठाकूर, प्रशांत पाटील यांनी सहकार्य केले. तसेच मुक्ताईनगर वनविभागाचे अधिकारी एन.एम.वानखेड़े, सुनिल पाटील, देवचंद तायडे यांनीदेखील सहकार्य केले . दरम्यान, सदर घटनेची वनविभागाने चौकशी करुन वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करावी व पालिका प्रशासनाने वृक्षतोड़ीबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, याबाबत वरणगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही.

 

Web Title:  Hundreds of thugs die due to tree trunk in Varangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.