Hoshiyoti kills one in Jalgaon city | जळगाव शहरात भररस्त्यावर दोघांकडून एकाला हॉकीस्टीकने मारहाण

ठळक मुद्दे गांधी मार्केटजवळील घटना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून हल्लेखोर पसार जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १३ : किरकोळ कारणावरुन रमेश श्रावण सोनवणे (वय ४५ रा.बालाजी मंदिरामागे, जळगाव) यांना भररस्त्यावर दोघांकडून हॉकिस्टीकने बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजता गांधी मार्केटच्या समोर घडली. सागर लिलाधर सैंदाणे व किरण लिलाधर सैंदाणे या दोघांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप सोनवणे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सोनवणे यांची गांधी मार्केटच्या बाहेर रस्त्याच्या कडेला पानटपरी आहे. किरण सैंदाणे हा तरुण व सोनवणे दोघंही एकाच परिसरात राहायला आहेत. मंगळवारी सोनवणे हे दारुच्या नशेत होते, त्यात ते शिवीगाळ करीत असल्याने त्यांचा तेथे एका जणाशी वाद झाला. हा वाद मिटल्यानंतर किरण याच्याशी त्यांचा वाद झाला. दोघांमध्ये शाब्दीक वाद व शिवीगाळ झाल्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी किरण व सागर या दोन्ही भावंडांनी सोनवणे यांना बेदम मारहाण केली. त्यात डोक्यात हॉकीस्टीकचा मार लागल्याने डोक्यातून तसेच नाक व कानातून रक्तस्त्राव झाल्याने ते जागेवरच कोसळले. सोनवणे यांना रक्त बंबाळ अवस्थेत पाहून पळापळ झाली तर काही जणांनी सोनवणे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर लागलीच खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.


Web Title: Hoshiyoti kills one in Jalgaon city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.