येथे माणुसकी ओशाळली... तो पेटत असताना नागरिकांची केवळ बघ्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:00 PM2018-05-26T15:00:58+5:302018-05-26T15:00:58+5:30

तालुक्यातील कळमसरे येथील रामलाल वामन चौधरी (वय-५०) या इसमाने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतले. ४४ अंश सेल्सीअस तापमानात हा इसम जळत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

Here humanity is confused ... only the role of the spectators when they are in chest | येथे माणुसकी ओशाळली... तो पेटत असताना नागरिकांची केवळ बघ्याची भूमिका

येथे माणुसकी ओशाळली... तो पेटत असताना नागरिकांची केवळ बघ्याची भूमिका

Next
ठळक मुद्देभीतीपोटी नागरिकांनी टाकले नाही अंगावर पाणीजळीत इसमाची ओळख पटविण्यास आली सुरुवातीला अडचण१०८ रुग्णवाहिका अर्ध्या तासानंतरही आली नाही.

संजय पाटील/ आॅनलाईन लोकमत
अमळनेर, जि.जळगाव, दि.२६ : तालुक्यातील कळमसरे येथील रामलाल वामन चौधरी (वय-५०,रा.माळीच गोराणे) या इसमाने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतले. ४४ अंश सेल्सीअस तापमानात हा इसम जळत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मदतीसाठी  १०८ रुग्णवाहिका बोलविल्यानंतर अर्धा तास झाल्यानंतरही ती न आल्याने या जळीताची तळमळ सुरु आहे.
अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावाजवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास एका ५० वर्षीय इसमाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. ४४ अंश सेल्सीअस तापमान आणि त्यात शरीराने घेतलेला पेट यामुळे हा इसम वेदनेने आरडाओरड करायला लागला. पाहता पाहता ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कुणी मोबाईलमध्ये व्हीडिओ काढले तर कुणी फोटो. यासाºयात शरीराची आग विझविण्यासाठी मात्र कुणाकडूनही प्रयत्न झाले नाही. वेदना होत असल्याने हा इसम जमिनीवर लोटांगण घालू लागला. एका व्यक्तीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र तब्बल अर्धा तास होऊन देखील रुग्णवाहिका न पोहचल्याने हा इसम विव्हळत होता. जळीत इसमाकडे केवळ सायकल असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र चौकशी केल्यानंतर रामलाल वामन चौधरी असे या इसमाचे नाव असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Here humanity is confused ... only the role of the spectators when they are in chest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.