जळगाव जिल्ह्यात भिज पावसाने पिकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:20 PM2017-08-20T13:20:46+5:302017-08-20T13:23:46+5:30

39.3 टक्के पाऊस

Heavy rains in Jalgaon district support the crops | जळगाव जिल्ह्यात भिज पावसाने पिकांना आधार

जळगाव जिल्ह्यात भिज पावसाने पिकांना आधार

Next
ठळक मुद्देपारोळा तालुक्यात सर्वाधिक पाऊसपिकांना जीवदानउत्पादन घटण्याची शेतक:यांना चिंता

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 - जिल्ह्यात ब:याच दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी व शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावत पिकांना जीवदान मिळाले आहे.  जिल्ह्यात आजपयर्ंत वार्षिक सरासरीच्या 39.3 टक्के पाऊस झाला आहे.  मागील वर्षी 19 ऑगस्टर्पयत वार्षिक सरासरीच्या 63.2  टक्के म्हणजेच 418.2   मिलीमीटर पाऊस पडला होता.  यावर्षी मात्र 259.9  मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.  
जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ापासून पाऊस नव्हता. श्रावणाच्या प्रारंभाला पावसाच्या सरी कोसळल्या नंतर मात्र पावसाने दडी मारली.  मात्र आता सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे.  
जिल्ह्यात आजपयर्ंत सार्वधिक 58.3 टक्के  पाऊस  पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी म्हणजेच 27.1 टक्के पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे. 
गेल्या दोन आठवडय़ापासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली होती. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र शुक्रवार व शनिवार सलग दोन दिवस पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी कपाशीसह इतर पिकांनाही फटका बसल्याने उत्पादन घटण्याची शेतक:यांना चिंता लागली आहे. 

Web Title: Heavy rains in Jalgaon district support the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.