ठळक मुद्देमालपूरला दमदार हजेरीपरिसरातील नदी, नाल्यांना पूर

ऑनलाईन लोकमत

निजामपूर/बळसाणे, जि. धुळे, दि. 14 -   साक्रीसह माळमाथा परिसरात बुधवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. निजामपुरला एका तीन मजली घरावर वीज कोसळली. त्यामुळे घराच्या भिंतीला तडाही गेला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला.
साक्रीसह माळमाथ्यावर बुधवारी दुपारी वादळी वा:यासह जोरदार पाऊस झाला.पावसामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला.
निजामपुरला वादळी वा:यासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर अचानक कानठळ्या बसविणा:या आवाजासह गांधी चौकातील गोकुळ आनंदा मोहने यांच्या तीन मजली घरावर वीज कोसळली. यामुळे त्यांच्या घराच्या भिंतीला तडा गेला आहे. वीजेच्या फिटींगची वायर तुटून पडली. परंतु त्यावेळी त्याठिकाणी कोणीच नसल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. बळसाणे येथील केसर नदीला या पावसामुळे पूर आला.
 शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावालाही बुधवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे मांडळ रस्त्यालगत असलेले जि.प.च ेसाठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, प.स.माजी उपसभापती सदाशिव गोसावी यांच्याहस्ते जलपूजन झाले. यावेळी राजेंद्र वाघ, प्रकाश माळी, खंडूसिंग राजपूत, श्रीराम माळी, वीरेंद्र पवार, अरुण गोसावी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित        होते.