तणावातून पाचोरा येथील सहायक निबंधकांना ह्रदयविकाराचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:24 PM2017-11-23T13:24:49+5:302017-11-23T13:25:39+5:30

कजर्माफीच्या कामासह वाढत्या कामाच्या तणावामुळे झटका आल्याचा कर्मचा-यांचा दावा

Heart attack in Pahora Assistant Registrar | तणावातून पाचोरा येथील सहायक निबंधकांना ह्रदयविकाराचा झटका

तणावातून पाचोरा येथील सहायक निबंधकांना ह्रदयविकाराचा झटका

Next
ठळक मुद्देपाटोळेंकडे दोन तालुक्यांचे कामजिल्हा उपनिबंधकांनी दिली भेट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 - शेतकरी कजर्माफी योजनेतील कामाचे वारंवार बदलणारे आदेश तसेच इतर कामांचा वाढता ताण यामुळे पाचोरा येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक पोपट श्यामराव पाटोळे (52) यांना बुधवारी कार्यालयात काम करीत असतानाच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा दावा कर्मचा:यांनी केला आहे. त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे सहकार विभागातील अधिकारी, कर्मचा:यांनी गर्दी केली होती. 
या बाबत मिळालेली माहिती अशी की, पाटोळे हे कार्यालयात काम करीत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्या वेळी त्यांना कार्यालयातील सहका:यांनीच प्रथम पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले. 
याची माहिती मिळताच जिल्हाभरातील सहकार विभागातील कर्मचा:यांनी रुग्णालयात धाव घेतली. या बाबत कर्मचा:यांनी सांगितले की, गेल्या जून महिन्यांपासून कजर्माफी योजनेचे काम मोठय़ा प्रमाणात वाढले असून अडचणीतील सहकारी पतसंस्थांचेही काम आहेच. सध्या कजर्माफीचे काम करताना ते पूर्ण झाले की पुन्हा त्यात बदल करण्याबाबत सूचना येतात किंवा परीपत्रक काढले जाते. त्यामुळे कर्मचारी सतत तणावात राहत असल्याचे कर्मचा:यांचे म्हणणे आहे. त्यातूनच पाटोळे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचा दावा कर्मचा:यांनी केला आहे. 
रोज रात्री 10 ते 11 वाजेर्पयत काम
कजर्माफी योजनेचे काम मोठय़ा प्रमाणात वाढल्याने दररोज रात्री 10 ते 11 वाजेर्पयत काम करावे लागत असले तरी ते संपत नाही, असे कर्मचा:यांचे म्हणणे आहे. 

झटका येणारे जिल्ह्यातील दुसरे अधिकारी
पाटोळे यांच्यापूर्वीही भुसावळ येथील सहायक निबंधक रवींद्र रामकृष्ण पाटील यांनाही दोन-तीन महिन्यांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे कर्मचा:यांनी सांगितले. 

पाटोळेंकडे दोन तालुक्यांचे काम
पोटोळे हे पाचोरा येथील सहायक निबंधक असून त्यांच्याकडे भडगाव तालुक्याचाही अतिरिक्त पदभार आहे. एक वर्षापूर्वी पाचोरा येथे आलेले पाटोळे हे पाचो:यात एकटेच राहतात व त्यांचे कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्यास आहे. 

जिल्हा उपनिबंधकांनी दिली भेट
पाटोळे यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्यासह सहायक निबंधक अशोक बागल, रवींद्र भोसले, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब महाले, दिलीप दोरकर यांनी भेट दिली व माहिती घेतली. अनेक कर्मचारी रात्रीर्पयत थांबून होते. 

Web Title: Heart attack in Pahora Assistant Registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.