ए.टी. पाटील यांच्या मताधिक्याचे रेकॉर्डही मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:55 AM2019-05-25T11:55:33+5:302019-05-25T11:56:40+5:30

यशाची परंपरा कायम राखली

A.T. He also broke the record of the margin of Patil | ए.टी. पाटील यांच्या मताधिक्याचे रेकॉर्डही मोडले

ए.टी. पाटील यांच्या मताधिक्याचे रेकॉर्डही मोडले

googlenewsNext

चंद्रशेखर जोशी
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार झालेल्या मतदान उमेदवारांची धाकधुक वाढविणारे होते. सत्ताधारी भाजपपुढे कडवे आव्हान असेल अशाच चर्चा होत्या मात्र प्रत्यक्षात मतदारांनी दिलेला कौल म्हणजे ‘छप्पर फाडके’ असल्याचेच समोर आले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघातील चाळीसगाव, अमळनेर, जळगाव शहर व पारोळा- एरंडोल मतदार संघातून भाजपाला धोक्याची घंटा असल्याचे जाणकारांचे अंदाज होते. चाळीसगाव हे भाजपाचे आमदार उन्मेष पाटील व राष्टÑवादीचे उमेदवार गुलाराब देवकर यांचे होमग्राऊंड. त्यामुळे या ठिकाणी जास्त चुरस असेल असे सांगितले जात होते. अमळनेर येथे पक्षांतर्गत वादाची पार्श्वभूमी व पाडळसरे धरणाच्या कामावरून असलेली नाराजी याचा परिणाम मतदानावर होईल असे सांगितले जात होते मात्र प्रत्यक्षात येथेही लाखावर मतदान भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना झाले आहे. पारोळ्यात विरोधी पक्षातील राष्टÑवादी कॉँग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे आमदार आहेत. त्यांचा या मतदार संघात संपर्कही मोठा आहे. असे असताना या मतदार संघातूनही उन्मेष पाटील यांना दीड लाखावर मतदान झाले आहे. जळगाव विधानसभा मतदार संघात सर्वात कमी मतदान झाले होते.
या मतदार संघात ४९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे कमी मतदान कुणाला तारणारे, कुणाला घातक अशा चर्चा होत्या प्रत्यक्षात मात्र १ लाख ९२ हजारापेक्षा जास्त मतदान शहरातील मतदारांनी उन्मेष पाटील यांना केले आहे. अशीच परिस्थिती अन्य मतदार संघातूनही दिसून आली. प्रत्येक ठिकाणी लाखावर मतदान मिळाल्याने उन्मेष पाटील यांनी खासदार ए.टी. पाटील यांचे ३ लाख ८३ हजाराच्या मताधिक्याचे रेकॉर्ड उन्मेष पाटील यांनी मोडले आहे.
विजयी उमेदवारांसमोरील आव्हाने काय?
शेती कर्ज माफी, उत्पादीत मालाला भावाचा विषय प्रचारात चर्चेला आला होता त्याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल.
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांचा विषय अनेक विषयांपासून प्रलंबित आहे. त्या कामाला गती द्यावी लागणार
पाडळसरे धरणाच्या कामावरून अनेक आंदोलने झाली. सिंचनाच्या या प्रकल्पासाठी प्रयत्न करावे लागणार
विधानसभेचे गणित कसे राहील...?
या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील जळगाव ग्रामीण व पाचोरा विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे तर चाळीसगाव जळगाव शहरात भाजपचे आमदार आहेत. पारोळा विधानसभा मतदार संघात राष्टÑवादीचा आमदार आहे. तर अमळनेरात अपक्षांची सत्ता आहे. युतीचा विचार करता जळगाव विधानसभा मतदार संघ २००९ मध्ये शिवसेनेकडे होता. त्यावर यावेळी हा पक्ष दावा करू शकतो. त्यावर भाजपला निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण विधानसभेच्या वेळीही युती असेल असेच सांगितले जात आहे.

Web Title: A.T. He also broke the record of the margin of Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव