केंद्रात आणि राज्यात सरकारे बदलली मात्र धोरणे बदलली नाहीत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:26 PM2017-11-20T18:26:38+5:302017-11-20T18:32:47+5:30

शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी चोपडा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले गेल्याची टीका केली.

 Governments and state governments changed, but policies have not changed ...! | केंद्रात आणि राज्यात सरकारे बदलली मात्र धोरणे बदलली नाहीत...!

केंद्रात आणि राज्यात सरकारे बदलली मात्र धोरणे बदलली नाहीत...!

Next
ठळक मुद्देसरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोपदेशात सर्वत्र कर सारखा असतांना उसाच्या दरात फरक का?

आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि.२० : केंद्रात आणि राज्यात नवीन सरकार आले, मात्र सरकार जरी बदलले तरी धोरणे मात्र बदलत नसल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी वाचला तरच राज्य आणि देश वाचेल असे परखड मत शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. येथील विश्रामगृहात सोमवारी सकाळी ९.०० वाजता पत्रपरिषद झाली.
ते म्हणाले की, सगळीकडे शेतकरी चिंतेत आहे. कर्जमुक्तीत फसवणूक झाली आहे. अस्वस्थता वाढली आहे. अॉनलाईन फंडामुळे घोळ सुरू आहेत, मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे कर्जमुक्ती विज्ञानाला धरून नाही. नोटाबंदीत झाले तेच कर्जमुक्तीत झाले म्हणून भीक नको पण कुत्रं आवर अशी परिस्थिती ओढवली आहे. खरीप हंगाम गेला आता रब्बी चालला आहे. राज्यात सर्वत्र अस्वस्थता आहे. यादीत नाव नाही म्हणून शेतकº्यांनी आत्महत्त्या केली. उद्योगपतींनी बॅका बुडविल्या. जेटलींनी २ लाख ११ कोटींची मदत केली.मात्र शेतकरी कर्जमुक्तीला अडथळे केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सरकार शेतकºयांना सापत्नभावाची वागणूक देत आहे . तूर, उडीद, गहू, हरभरा यांचे बाजारभाव पडले आहेत. ऊसाच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे. आताच्याही सरकारला कारखानदारांनी विकत घेतले आहे. ऊसाच्या प्रति टन भावात २५५० मूलभूत दरात ७०० चा फरक आहे. ऊसाला प्रति टन चार हजाराच्या आसपास गुजरातमध्ये भाव आहे. महाराष्ट्रात शेतकº्याला भाव का मिळत नाही? सर्वत्र कर सारखा आहे मात्र ऊसाचं दरात फरक का? हे समजत नाही. साखर कारखानदारांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. प्रति टन एक ते दीड हजाराचा फटका बसतो आहे. शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही लूट थांबणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

 

Web Title:  Governments and state governments changed, but policies have not changed ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.