पाचोरा तालुक्यातील वरखेडी-भोकरी येथे गोमाता पूजन व दीपयज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:30 PM2019-03-19T18:30:35+5:302019-03-19T19:20:13+5:30

वरखेडी-भोकरी येथील महावीर गोशाळेत पाचोरा गायत्री परिवाराच्या महिला साधकांनी मंगळवारी विश्वशांती अभियान स्वसंरक्षणार्थ दीपोत्सव करीत शाळेतील सर्व गाईंना गावरानी तुपाची पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.

Gomata Pujan and Deepayatra at Warkhedi-Bhokari in Pachora taluka | पाचोरा तालुक्यातील वरखेडी-भोकरी येथे गोमाता पूजन व दीपयज्ञ

पाचोरा तालुक्यातील वरखेडी-भोकरी येथे गोमाता पूजन व दीपयज्ञ

googlenewsNext
ठळक मुद्देपूजा स्वास्थ्यासाठी केली पूजापरिसरातील साधकांचा सहभाग

वरखेडी ता.पाचोरा, जि.जळगाव : वरखेडी-भोकरी येथील महावीर गोशाळेत पाचोरा गायत्री परिवाराच्या महिला साधकांनी मंगळवारी विश्वशांती अभियान स्वसंरक्षणार्थ दीपोत्सव करीत शाळेतील सर्व गाईंना गावरानी तुपाची पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.
यावेळी गाईची विधिवत पूजा करण्यात येऊन गाईस परिक्रमादेखील करण्यात आली. त्यानंतर गायत्री मंत्रोच्चार करीत दीपयज्ञ केलात्न गायत्री परिवाराचे प्रमुख लीला तोतला यांनी या दीपयज्ञाविषयी माहिती देताना सांगितले की, पुलवामा घटनेतील शहीद सैनिकांना याद्वारे श्रद्धांजली अर्पण करून सिंहस्थ पर्वाच्या पवित्र काळी सर्व साधकांनी साधना केली. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने या दिवसाचे महत्त्व लक्षात आणून दिले.
यावेळी सदृढ भारत स्वस्थ भारत निर्माण व्हावा यासाठीदेखील पूजन करण्यात आले.
पाचोरा गायत्री परिवाराच्या लीला तोतला, देवकी वर्मा, सारिका तोतला, रजनी नाळके, राधिका तोतला, सरस्वती पाटील, सुभद्रा पाटील, विद्या पाटील, शैला वाणी, वैशाली पाटील, अनिकेत तोतला, कल्पना पुजारी, उषा पाटील, द’पाली खैरनार, मीरा पाटील, चव्हाण, सुमित्रा पवार, पूजा पाटील, सुनीता पाटील, वैशाली पाटील, निर्मला जैन या साधकांंची उपस्थिती होती.

Web Title: Gomata Pujan and Deepayatra at Warkhedi-Bhokari in Pachora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.