मुलींमध्ये संयमाचा संस्कार आईने रुजवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:07 PM2019-03-15T16:07:16+5:302019-03-15T16:09:16+5:30

स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. म्हणूनच स्त्रियांनी आपसात संवाद ठेवला तर कुटुंंबाची वीण घट्ट राहू शकते. मुलींमध्ये आईने जाणीवपूर्वक संयमाचा संस्कारदेखील रुजवणे गरजेचे आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हेच दर्शविते. वयोवृद्धांना पोटगी मिळविण्यासाठी न्यायालयात यावे लागते. हे आपल्या ढासळत्या कुटुंब व्यवस्थेचे लक्षण असल्याचे उद्बोधन न्यायाधिश अनिता गिरडकर यांनी केले.

The girls should recite Samyama's rituals in girls | मुलींमध्ये संयमाचा संस्कार आईने रुजवावा

मुलींमध्ये संयमाचा संस्कार आईने रुजवावा

Next
ठळक मुद्देन्यायाधिश अनिता गिडकर यांचे उद्बोधनचाळीसगावात वाणी महिला मंडळाचे आयोजनआदर्श माता गौरव सोहळा८०० कुटुंबांची परिचय पुस्तिका

चाळीसगाव, जि.जळगाव : स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. म्हणूनच स्त्रियांनी आपसात संवाद ठेवला तर कुटुंंबाची वीण घट्ट राहू शकते. मुलींमध्ये आईने जाणीवपूर्वक संयमाचा संस्कारदेखील रुजवणे गरजेचे आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हेच दर्शविते. वयोवृद्धांना पोटगी मिळविण्यासाठी न्यायालयात यावे लागते. हे आपल्या ढासळत्या कुटुंब व्यवस्थेचे लक्षण असल्याचे उद्बोधन न्यायाधिश अनिता गिरडकर यांनी येथे केले.
गुरुवारी सायंकाळी त्यांच्या अध्यक्षतेखाली लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने आयोजित एकता समाजदर्शिका प्रकाशन व आदर्श माता गौरव सोहळा वाणी समाज मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपिठावर प्रा.उषा बागड, रेखा अमृतकार, जयश्री अमृतकार यांच्यासह पंचकमिटीच्या प्रमुख वत्सला केशव कोतकर, सुलभा अमृतकार, मालती पाटे, अंजली येवले आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना न्यायाधिश गिरडकर यांनी भारतीय कुटुंब पद्धतीसमोरील नव्याने उभ्या राहिलेल्या आव्हानांचा मागोवा घेतला. वयोवृद्ध व्यक्तिंना अखेरच्या दिवसात जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांचा सांभाळ व्हावा. यासाठी न्यायालयाला कायदेशीर लढाई लढावी लागते. आई-वडिलांचा सांभाळ करणे हे मुलांचे कर्तव्यच आहे. यापुढे आदर्श सासू, स्मार्ट सुनबाई यांचाही गौरव झाला पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
प्रास्ताविकात वत्सला कोतकर यांनी एकता समाजदर्शिका कशी घडली याचा प्रवास मांडला. कुटुंबाचे पाठबळ असल्यामुळेच ४५ दिवसात ८०० कुटुंबांचा परिचय या पुस्तिकेत संकलित करता आल्याचेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
यावेळी उद्योगपती केशव कोतकर, आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद कोतकर, बाजार समितीचे संचालक जितेंद्र वाणी, वाणी समाजाचे अध्यक्ष शरद मोराणकर, सचीव सी.सी.वाणी, भूषण ब्राह्मणकार, अनिल कोतकर, हिरालाल शिनकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कामिनी अमृतकार व डॉ.शुभांगी कोतकर यांनी केले. यशस्वीतेसाठी उत्सव समितीतील कल्पना पाखले, माधुरी वाणी, मीना कुडे, आशालता पिंगळे, कल्पना राणे, वैशाली शिरोडे, वैशाली अमृतकार, वर्षा पिंगळे यांनी परिश्रम घेतले.
आदर्श मातांचा गौरव
भारतीय नाविक दलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल सुनील भोकरे यांच्या आई इंदू भोकरे, नासागर्ल स्वीटी पाटे हिच्या आई ज्योती पाटे आणि चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांच्या आई कमल कोतकर यांचा आदर्श माता म्हणून करण्यात गौरव करण्यात आला. नगरसेविका योगिनी भूषण ब्राह्मणकार यांना सामाजिक बांधिलकीसाठी गौरविण्यात आले. मानपत्राचे शब्दांकन जिजाबराव वाघ यांनी केले होते.

Web Title: The girls should recite Samyama's rituals in girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.