जळगावात पैसे मागणाऱ्या बालिकेच्या डोक्यात मारला डबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:06 PM2018-05-23T22:06:34+5:302018-05-23T22:06:34+5:30

नाश्त्यासाठी पैसे मागणाºया तीन वर्षीय बालिकेला नाश्त्याच्या दुकानावरील स्टीलचा डबा हाणून फेकल्याने ही बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालय चौकात घडली.

The girl who was demanding money in Jalgaon | जळगावात पैसे मागणाऱ्या बालिकेच्या डोक्यात मारला डबा

जळगावात पैसे मागणाऱ्या बालिकेच्या डोक्यात मारला डबा

Next
ठळक मुद्देडबा मारणाºयाला जमावाने चोपलेबालिकेच्या नाका-तोंडातून रक्तस्त्रावजमावाच्या मारहाणीनंतर तरुण पळाला

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२३ : नाश्त्यासाठी पैसे मागणाºया तीन वर्षीय बालिकेला नाश्त्याच्या दुकानावरील स्टीलचा डबा हाणून फेकल्याने ही बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालय चौकात घडली. या बालिकेच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे पाहून डबा हाणून फेकणाºयाला जमावाने चांगलेच चोपून काढले.
याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेली माहिती अशी की, वर्षा परमेश्वर गजभारे (रा.वाटूक, जि.यवतमाळ) ही महिला तीन वर्षाची मुलगी गायत्री व अन्य नातेवाईकासह न्यायालय चौकात आले असता तेथे नाश्त्याच्या दुकानाजवळ थांबलेल्या तरुणांकडे गायत्री नावाच्या बालिकेने नाश्त्यासाठी पाच रुपये मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने तेथे थांबलेल्या तरुणाने नाश्त्याच्या दुकानावरील डबा उचलून बालिकेच्या तोंडावर मारुन फेकला. त्यात बालिकेच्या डोक्याला, नाकाला व तोंडाला जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. चिमुरडीच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित नागरिकांनी डबा मारणाºया तरुणाला बेदम चोपले. हा तरुण शिवाजी नगरातील रहिवाशी असून तो मद्याच्या नशेत होता व नाश्ता करण्यासाठी न्यायालय चौकात आला होता.

Web Title: The girl who was demanding money in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव