आदर्श गाव घुमावल बुद्रुकला गणेशोत्सवाचे पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:13 PM2017-09-19T12:13:51+5:302017-09-19T12:14:59+5:30

सामाजिक कार्याची घेतली दखल : एक गाव एक गणपती मंडळाचा पोलीस प्रशासनातर्फे सत्कार

Ganeshotsav Award for Adarsh ​​Gram Ghumawal Budruk | आदर्श गाव घुमावल बुद्रुकला गणेशोत्सवाचे पारितोषिक

आदर्श गाव घुमावल बुद्रुकला गणेशोत्सवाचे पारितोषिक

Next
ठळक मुद्देगेल्या 4 वषार्पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत ‘एक गाव एक गणपती’  समाज प्रबोधनपर व्याख्यान

ऑनलाईन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 19 -  चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक येथील ‘एक गाव एक गणपती’ या सार्वजनिक गणेश मंडळास ‘सार्वजनिक गणेशोत्सव 2017’चे  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या मार्गदर्शनाखाली  चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने  प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रफीक  शेख,  पोलीस निरीक्षक बी.बी.नंदूरकर  संदिप धनगर याच्याहस्ते मंडळास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
 गावात गेल्या 4 वषार्पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंतर्गत ‘एक गाव एक गणपती’ हा सामाजिक एकात्मतेचा उपक्रम ग्रामस्थ व तरूण कार्यकत्र्यांचा माध्यमातून राबविला जातो. सदर गणेशोत्सव काळात वृक्षरोपण, मुला-मुलींसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा,  समाज प्रबोधनपर व्याख्यान, गुणवंतांचा सत्कार आदी समाज उपयोगी उपक्रम मंडळामार्फत राबविण्यात आले होते.  
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस ‘ना वाजा, ना डिजे’ संकल्पना राबवून ह. भ. भजनी मडंळाने गणपती बाप्पाचे विसर्जन कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता गावातील व युवकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडली. या सर्व गोष्टींची दखल घेऊन गाव व मंडळास सन्मानित करण्यात आले. गावात अशी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, असे शिवराम पाटील, सरपंच प्रकाश पाटील (मुख्यमंत्री मित्र), तंटामुक्टी अध्यक्ष सजंय पाटील, सुतगिरणी संचालक तुकाराम पाटील, पोलीस पाटील हिरामण पाटील, माजी उपसरपंच माणिक पाटील, उपसरपंच वत्सलाबाई पाटील, वसंतराव पाटील, वि. का. सोसायटीचे चेअरमन सदाशिव पाटील, युवराज पाटील, ग्रामसेवक दिनेश पाटील व आदर्श गावाचे सर्व नवतरुण युवक व ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Ganeshotsav Award for Adarsh ​​Gram Ghumawal Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.