काँग्रेस-राष्टÑवादीमध्ये किमान ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:51 PM2018-07-16T13:51:01+5:302018-07-16T13:52:54+5:30

मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व १७ उमेदवारांची बैठक रविवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता काँग्रेस भवन येथे महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार किमान ८ ठिकाणी समोरासमोर आले असल्याने उमेदवार माघारीचे अधिकार महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांना देण्यात आले.

In a friendly fight for at least five seats in the Congress-Nation contestant | काँग्रेस-राष्टÑवादीमध्ये किमान ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत

काँग्रेस-राष्टÑवादीमध्ये किमान ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस निर्णयावर ठाममाघारीचे अधिकार महानगराध्यक्षांकडेकाँग्रेस भवनात झालेल्या बैठकीतील निर्णय

जळगाव : मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व १७ उमेदवारांची बैठक रविवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता काँग्रेस भवन येथे महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार किमान ८ ठिकाणी समोरासमोर आले असल्याने उमेदवार माघारीचे अधिकार महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांना देण्यात आले.
काँग्रेसच्या उमेदवारांची बैठक रविवारी काँग्रेस भवनात झाली. यावेळी शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, शाम तायडे, कफिल अहमद आदी व १६ उमेदवार उपस्थित होते. त्यात उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, निवडणुकीचा दैनंदिन खर्च भरावा, परवान्याशिवाय पोस्टर्स लावू नये, त्यासाठीचा प्रो-फॉर्मा पक्षाकडून घ्यावा व त्यानुसारच बॅनर लावावे. जेणेकरून पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या बॅनरमध्ये सुसूत्रता राहिल. प्रत्येक प्रभागात १८ ते २२ बुथ असून त्यासाठी बुथ एजंट नेमून त्यांचे मतदान ओळखपत्र व फोटो, माहिती पक्षाकडे जमा करा. जेणेकरून त्यांना प्रशिक्षण देता येईल. तसेच प्रत्येक उमेदवाराने दोन कार्यकर्त्यांची नावे समन्वयक म्हणून द्यावीत. जेणेकरून उमेदवाराशी संपर्क झाला नाही तरीही पक्षाशी संपर्क कायम राहिल.

Web Title: In a friendly fight for at least five seats in the Congress-Nation contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.