तालुकास्तरीय वॉटर कप विजेत्या अमळनेरातील नगाव खुर्द गावाला मोफत वॉटर फिल्टर प्लँट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 06:35 PM2018-08-29T18:35:07+5:302018-08-29T18:35:31+5:30

मुंबईच्या रोटरी क्लबने घेतला पुढाकार : ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

Free Water Filter Plant at Nagaon Khurd village, Taluka-level water cup winner | तालुकास्तरीय वॉटर कप विजेत्या अमळनेरातील नगाव खुर्द गावाला मोफत वॉटर फिल्टर प्लँट

तालुकास्तरीय वॉटर कप विजेत्या अमळनेरातील नगाव खुर्द गावाला मोफत वॉटर फिल्टर प्लँट

googlenewsNext

अमळनेर, जि.जळगाव : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतील विजेत्या गावांसाठी रोटरी क्लब मुंबईतर्फे विनामूल्य वॉटर फिल्टर प्लँट देण्यात येणार आहे. याचा सर्व खर्च रोटरी क्लब मुंबई करणार आहे. यासाठी नगाव खुर्द, ता.अमळनेर येथे बुधवारी संबंधित संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले.
स्पर्धेतील ७५ तालुके आणि राज्य पातळीवरील एकूण ८० गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर प्लँट म्हणजे सुरक्षित पेयजलाचा लाभ देण्याचे रोटरी क्लब मुंबई ठरविले आहे. यात संबंधित गावांतील पिण्याच्या पाण्याचे परीक्षण करून सुरक्षित पेयजलाविषयी उपाययोजना सुचवून मदत केली जाईल. यासाठी २९ रोजी मुंबई येथील युरेका फोर्सचे व्यवस्थापक (विक्री) जोयल जॉय यांनी येथे भेट देत सर्वेक्षण केले. या वेळी पाणी फाऊंडेशनची टिम उपस्थित होती.
नगाख खुर्द येथील पाणीपुरवठा होणाऱ्या गावविहिरीचे पाणी तपासण्यात आले. यासाठी सरपंच प्रेरणा बोरसे यांनी ग्रामपंचायतीने आरओ प्लँटसाठी जागा, वीज उपलब्ध करून देण्यासह परवानगी ग्रामपंचायतीच्या वतीने दिली. त्यामुळे आता गावकºयांना शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे. ग्रामस्थांचे आरोग्य सुदृढ बनणार आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमदानाची ही प्रचिती असल्याचे सरपंच प्रेरणा बोरसे यांनी सांगितले.


 

Web Title: Free Water Filter Plant at Nagaon Khurd village, Taluka-level water cup winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.