ठळक मुद्देमालवाहू चारचाकी वाहनाने दिली दुचाकीला धडकरावसाहेब पाटील यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने जागीच मृत्यूरस्त्यावरील वाहनधारकांनी मदत न केल्याने तब्बल 45 मिनिटे जखमी रस्त्यावर पडून

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, दि.13 - नरडाणाकडे जाणा:या मालवाहतूक करणा:या वाहनाने बुधवार 13 रोजी सकाळी 9 वाजता एकलहरे गावाजवळ एका दुचाकीला दिलेल्या धडकेत रावसाहेब शामराव पाटील हे जागीच ठार झाले तर जखमी लताबाई भिल या महिलेला कृउबा संचालकाने माणुसकी दाखवित तत्काळ आपल्या वाहनातून रुग्णालयात दाखल केल्याने डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहे.

अमळनेर तालुक्यातील लोन येथील रावसाहेब शामराव पाटील (वय-35) व लताबाई नाना भिल (वय-50) हे मोटारसायकल (क्र.एम एच 19 - 7276 न ेनरडाणा येथून लोण कडे येत होते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास नरडाणेकडून बटाटे वाहून नेणारी मालवाहतूक वाहन (क्र.एम.एच.19 डी.एम.5538) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात रावसाहेब पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर लताबाई भिल या जखमी झाल्या. मयत व जखमींची ओळख पटविल्यानंतर अपघाताबाबत लोण या गावात माहिती देण्यात आली. त्यानंतर गावातून अशोक साहेबराव पाटील व डॉ भिकन पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमी लताबाई यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी नागरिकांनी वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसोबत संपर्क साधला. मात्र तब्बल पाऊण तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही.

या दरम्यान रस्त्यावरून कृउबा संचालक पावभा अमृत पाटील हे जात होते. त्यांनी आपले वाहन थांबवित मयत व जखमींना स्वत:च्या वाहनात टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी जखमी महिलेवर उपचार सुरु करण्यात आले. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.