मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड येथे एस.एम.कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:16 PM2018-11-13T17:16:02+5:302018-11-13T17:17:00+5:30

मुक्ताईनगर येथील एस.एम. कॉलेजमध्ये २००२ साली बी.ए.चे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुंड गावी उत्साहात पार पडला. तब्बल १६ वर्षांनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी जमले होते.

Former students of SM College will join the Kund in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड येथे एस.एम.कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड येथे एस.एम.कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिला गत स्मृतींना उजाळाबाहेरगावी गेलेले जमले सर्व वर्गमित्र

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर येथील एस.एम. कॉलेजमध्ये २००२ साली बी.ए.चे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुंड गावी उत्साहात पार पडला. तब्बल १६ वर्षांनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी जमले होते. यात गत स्मृतीना उजाळा दिला. या कार्यक्रमात बाहेरगावी गेलेल्या सर्व मित्र एकत्र जमले होते. यात कोणी प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, शेतकरी, व्यावसायिक उद्योग कार्यरत असलेल्या पदावर पाहून आयोजकांचेदेखील उपस्थितांनी कौतुक केले.
अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंबादास इंगळे, बाळू पाटील, विजय साळुंखे, प्रदीप तराळ, उमेश दैवे , महेंद्र सपकाळे, प्रकाश सपकाळे, संजय चौधरी, नितीन दुट्टे, कृष्णा दुट्टे, अशोक आमोदे, शिवाजी वंजारी, तुषार पटेल, संदीप राणे, प्रमोद बोराखेड, महादेव काकडे, वीरेंद्र जाधव, ज्ञानेश्वर भगत, कैलाश खोंदले, प्रमोद महाजन, प्रदीप कोल्हे, समाधान पाटील, के.पी.पाटील, आदींसह सहभाग नोंदवला.
आपल्या वर्गशिक्षक व तज्ज्ञविषय शिक्षकांच्या लक्षणीय अध्यापन कौशल्यांना उजाळा देत कविता, देशभक्तीपर गीत, सीने गीत, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आजही बीएच्या धडकत्या युवा स्पदनांना अनुभूतीची जाणीव करून दिली. सुखदु:खाच्या आठवणीनी एकमेकांना भेटायला आतुरता सुखद झाली. सूत्रसंचालन विजय साळुंखे, उमेश दैवे यांनी केले.




 

Web Title: Former students of SM College will join the Kund in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.