माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा दमानियांविरुद्ध मानहानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 08:08 PM2018-06-22T20:08:36+5:302018-06-22T20:10:50+5:30

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरूध्द मानहानीचा फौजदारी दावा शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात सादर केला.

Former minister Eknath Rao Khadse's claim of defamation against insurgents | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा दमानियांविरुद्ध मानहानीचा दावा

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा दमानियांविरुद्ध मानहानीचा दावा

Next
ठळक मुद्देदावा सादर करण्यासाठी खडसे जिल्हा न्यायालयात हजरखडसे यांनी केली विधीतज्ज्ञांसोबत चर्चासहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरूद्धच्या खटल्यातही सुनावणी

जळगाव- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरूध्द मानहानीचा फौजदारी दावा शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात सादर केला. हा दावा दाखल करण्यासाठी खडसे हे न्यायालयात दुपारी २़०५ वाजता दाखल झाले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते़ त्यांनी प्रथम अ‍ॅड़ प्रकाश़बी़पाटील यांच्याशी चर्चा केली़ यावेळी अ‍ॅड़हरूल देवरे, अ‍ॅड़बी.एस.पाटील, अ‍ॅड़ वसंत ढाके, अ‍ॅड़ आनंद मुजूमदार, अ‍ॅड़सुनिल चौधरी, अ‍ॅड़ प्रवीण जंगले उपस्थित होते़
२५ मिनिटे चर्चा केल्यानंतर ते दुपारी २़३२ वाजता असिस्टंट सुप्रिटेडंट यांच्याकडून जावून दावा दाखल करण्याबाबतच्या कागदपत्राची पडताळणी केली. यानंतर इंडियन पिनलकोड कलम ५०० प्रमाणे मानहानीचा फौजदारी खटला न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
न्यायालयावर अविश्वास व माझी बदनामी केल्याने दावा -खडसे
न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर खडसे पत्रकारांना म्हणाले की, मी अंजली दमानियांविरुद्ध २२ बदनामीचे दावे दाखल केले असून रावेर न्यायालयात दबाव टाकून अटक वॉरंट काढले असे दमानिया यांनी टष्ट्वीटरवर टष्ट्वीट केले आहे. खडसे हे न्यायालयावर दबाव टाकून काहीही करू शकतात असे चित्र दमानिया यांनी उभे करण्याचा प्रयत्न केला़ यातून मी गुंड प्रवृत्तीचा आहे असे त्या दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ त्यामुळे न्यायालयावर दाखवलेला अविश्वास व माझी बदनामी केल्यामुळे मी मानहानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
गुलाबराव पाटील यांच्याविरुद्धच्या खटल्याचीही झाली सुनावणी
अंजली दमानिया यांच्याविरूध्द मानहानीचा दावा सादर केल्यानंतर दुपारी २़४७ वाजता सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर खडसे यांनी दाखल केलेल्या ५ कोटींच्या मानहानीच्या खटल्याची शुक्रवारी सुनावणी होती. त्यासाठी खडसे हे उपस्थित होते. या खटल्यास गती देण्यात यावी अशी विनंती खडसे यांच्यातर्फे अ‍ॅड़ प्रकाश़बी़पाटील यांनी न्यायालयास केली़ त्यानंतर १४ आॅगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली.

Web Title: Former minister Eknath Rao Khadse's claim of defamation against insurgents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.