तरुणाच्या खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:15 PM2019-04-25T22:15:24+5:302019-04-25T22:17:21+5:30

पळासखेडा (गुजराचे), ता.जामनेर येथील अनिल कडू खंडारे या तरुणाच्या खून प्रकरणात आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे (सर्व रा.पळासखेडा गुजराचे ता.जामनेर) या पाच जणांना न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.

Five people were given life imprisonment in connection with the murder of the youth | तरुणाच्या खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप

तरुणाच्या खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप

Next
ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन केला होता खूनजखमी अवस्थेत फेकले विहिरीत

जळगाव : पळासखेडा (गुजराचे), ता.जामनेर येथील अनिल कडू खंडारे या तरुणाच्या खून प्रकरणात आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे (सर्व रा.पळासखेडा गुजराचे ता.जामनेर) या पाच जणांना न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी सात वाजता आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे या पाच जणांनी गल्लीतील लहान मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन अनिल खंडारे याला बेदम मारहाण केली होती. यावेळी पत्नी सुनीता हिने धाव घेऊन पतीची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. मला लहान मुले आहेत, पतीला मारु नका अशी विनंती करीत असतानाही या पाच जणांनी अनिल याला मार सुरुच ठेवला होता. यावेळी अनिल याचा भाऊ व वहिणी यांनीही आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी दयामया न दाखविता अनिल याला जखमी अवस्थेत जामनेर रस्त्यावरील एका विहिरीत फेकून दिले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पत्नी सुनीता खंडारे यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलीस स्टेशनला पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच ठरले पुरावे
तपासाधिकारी व्ही.आर.शित्रे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुन्हा सिध्द करण्यासाठी मृत अनिल याची पत्नी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुनीता खंडारे, भाऊ वसंत कडू खंडारे, वहिणी लताबाई सुनील खंडारे याशिवाय डॉ.रवींद्र कडू पाटील, तपासाधिकारी व्ही.आर.शित्रे व अशोक उतेकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. शवविच्छेदन अहवाल पुरावा ठरला.
अशी आहे शिक्षा व दंड
सर्व आरोपींना ३०२ सह १४९ नुसार दोषी धरुन जन्मठेप, प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसाचा साधा कारावास व १४७ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास, प्रत्येकी २०० रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास, ३२३ अन्वये सहा महिने कारावास व प्रत्येकी १०० रुपये दंड, दंड भरल्यास सात दिवस कैदेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.निलेश दयाराम चौधरी यांनी कामकाज पाहिले. अ‍ॅड.एस.जी.काबरा यांनी काही आरापींची सरतपासणी घेतली होती. पैरवी अधिकारी म्हणून शालीग्राम पाटील यांनी सहकार्य केले. बचावपक्षातर्फे अ‍ॅड.कृष्णा बनकर यांनी काम पाहिले.

Web Title: Five people were given life imprisonment in connection with the murder of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.