बायको समजून वृध्दाच्या डोक्यात घातला फावड्याचा दांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:35 PM2019-03-26T13:35:54+5:302019-03-26T13:39:27+5:30

बायको समजून शेतमालक प्रभाकर शंकर पाटील (७५) या वृध्दाच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून खून केल्याची घटना वडनगरी, ता. जळगाव येथे मंगळवारी सकाळी पहाटे चार वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर हल्लेखोर शांताराम पावरा हा फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधार्थ रवाना झाले आहे.

FISH | बायको समजून वृध्दाच्या डोक्यात घातला फावड्याचा दांडा

बायको समजून वृध्दाच्या डोक्यात घातला फावड्याचा दांडा

Next
ठळक मुद्देवडनगरी येथे खून  मद्याच्या नशेत केले संशयिताने कृत्य हल्लेखोर फरार

जळगाव : बायको समजून शेतमालक प्रभाकर शंकर पाटील (७५) या वृध्दाच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून खून केल्याची घटना वडनगरी, ता. जळगाव येथे मंगळवारी सकाळी पहाटे चार वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर हल्लेखोर शांताराम पावरा हा फरार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधार्थ रवाना झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वडनगरी येथे प्रभाकर शंकर पाटील यांच्या खळ्यात शांताराम पावरा ह पत्नी गिता व दोन मुलांसह राहत होता. त्यांच्याकडे तो कामालाही होता. सोमवारी शांताराम याने दारुच्या नशेत पत्नीशी वाद घातला, त्यामुळे गिता ही मुलांसह खेडी येथे राहणारा भाऊ राजू सिताराम पावरा याच्याकडे निघून गेली. त्यानंतर शांताराम याने सायंकाळी पाच वाजता प्रभाकर पाटील यांचा नातू गजानन शिवाजी पाटील यालाही दारुच्या नशेत मारहाण केली. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दवाखान्यात आठ ते दहा टाके घालण्यात आले. गजानन याने या वादाची तक्रार पोलिसात केली नव्हती.

पत्नी व शालकाला घेतले ताब्यात
या घटनेनंतर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, वासुदेव मराठे, संजय चौधरी, ईश्वर लोखंडे, जितेंद्र पाटील, अमीर तडवी, शैलेश चव्हाण व संदीप पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर भावाकडे गेलेली शांतारामची पत्नी गिता व तिचा भाऊ राजू या दोघांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले. शांतारामविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: FISH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.