पहिल्या फेरीपासून अपक्षांवर नोटा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:12 PM2019-05-26T12:12:01+5:302019-05-26T12:12:46+5:30

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नोटाचा वापर तब्बल ७०६४ मतांनी अधिक वाढला़

From the first round, the notes are very heavy on the strangers | पहिल्या फेरीपासून अपक्षांवर नोटा भारी

पहिल्या फेरीपासून अपक्षांवर नोटा भारी

Next

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून अपक्षांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत. ही संख्या प्रत्येक फेरीला वाढत गेली आहे़
जळगाव लोकसभा मतदारसंघातील रिंगणातील १४ उमेदवारांपैकी ११ उमेदवारांना प्रत्येक फेरीला नोटा पेक्षा कमी मते मिळालेली होती़ यात सहा अपक्षांचा समावेश आहे़ निवडणुकीच्या मैदानात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आपल्याला मान्य नसल्यास नोटा (नन आॅफ अबोव्ह) अर्थात वरीलपैकी कोणीही नाही हा पर्याय उपलब्ध असतो़
या सर्व उमेदवारांना नाकारणाऱ्यांची संख्या यंदा वाढली आहे़ जळगाव मतदारसंघासाठी यंदा मतमोजणीच्या २९ फेºया झाल्या़ यात पाहिल्या फेरीपासूनच चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात झाली होती़ एकाही अपक्षाला दहा हजारांपर्यंत मजल मारता आलेली नाही़ अपक्षांमध्ये सर्वाधिक अनंत महाजन यांना तर सर्वात कमी ललित शर्मा यांना मते मिळाली आहे़
नोटाचा वापर
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नोटाचा वापर तब्बल ७०६४ मतांनी अधिक वाढला़

Web Title: From the first round, the notes are very heavy on the strangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव