अक्षय तृतीयेचे नवीन संदर्भ शोधू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:33 PM2019-05-07T17:33:11+5:302019-05-07T17:33:32+5:30

भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक तथा शिक्षिका सीमा भारंबे यांनी अक्षय तृतीयेतून काही नवीन संदर्भ शोधता येऊ शकतात या दृष्टिकोनातून घेतलेला वेध...

Find new references to Akshaya Trutiya | अक्षय तृतीयेचे नवीन संदर्भ शोधू या

अक्षय तृतीयेचे नवीन संदर्भ शोधू या

googlenewsNext

अक्षय तृतीया... आखाजी... पितृ देवोत्सव, दोलोत्सव, वसंतोत्सव, चंदनयात्रा, आखिती, आख्यातरी, अखतारी अशा अनेक नावाने हा सण संपूर्ण देशात साजरा होतो. विशेषत: खान्देशात या सणाला खूप वेगळं महत्त्व आहे.
वडाच्या गर्द छायेखाली बांधलेला झोका आणि त्यावर बसून मस्त रंगलेला खेळ, गाणी हे दृश्य आता जवळपास दुर्मीळच!
पुराणातील काही संदर्भानुसार सत्य, कृत आणि त्रेता युगाचा प्रारंभ दिन अक्षय तृतीयेपासूनच केला जातो. भगवान परशुरामचा जन्मदिन याच दिवशी झाल्याने मंगल कर्म करण्याची प्रथा आहे. विशेषत: ग्रामीण भागात या दिवसात असणारी पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणी बचतीचा संदेशही यानिमित्ताने दिला जातो. अक्षय तृतीया हा सण केवळ सण म्हणून न पाहता त्यातील तत्कालिक संदर्भ म्हणून पाहिला पाहिजे. चैत्र महिन्यात हळदी कुंकू करण्याची महिलांची प्रथा आहे. यात महिला विविध पदार्थ खाऊ घालतात. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अक्षय तृतीया लक्षात राहते ती यासाठी की, उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद संपून या दिवसापासून लहान मुलांना अक्षरज्ञान देण्याची प्रथा आजही काही खेड्यात पाळली जाते. पुरातन संदर्भ काहीही असले तरी अक्षय तृतीयेचा नवा संदर्भ लक्षात घेऊन सण साजरा केला पाहिजे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.
-सीमा भारंबे, भुसावळ, जि.जळगाव

Web Title: Find new references to Akshaya Trutiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.