शेतक-यांना पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ कोटी २२ लाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:22 PM2019-04-25T22:22:21+5:302019-04-25T22:25:18+5:30

धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.

The farmers will get 38.22 million rupees in the first phase | शेतक-यांना पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ कोटी २२ लाख 

शेतक-यांना पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ कोटी २२ लाख 

googlenewsNext
ठळक मुद्दे  भूसंपादन प्रकरण  २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड

जळगाव :  धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.
तापी पाटबंधारे महामंडळाने २००० मध्ये धरणाकरीता चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा व पातोंडा येथील २०५ शेतक-यांच्या जमिनींचे भूसंपादन केले होते. २००६ मध्ये मोबदला देण्याचे निश्चित झाले. मात्र मोबदला मिळत नसल्याने शेतक-यांनी २०१० मध्ये न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल २०१५ मध्ये लागला. रक्कम कमी मिळत असल्याने शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेली. खंडपीठाने रक्कम वाढवून देण्याचे आदेश दिले.
विधी सेवा प्राधिकरणाचे यश
या रकमेच्या मोबदल्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने पुढाकार घेऊन शेतकºयांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यासाठी १६० कोटी पेक्षा जास्त रक्कम देण्याचे निश्चित झाले. त्याचा पहिला टप्पा एक तृतियांश रक्कम गुरुवारी शासनाने कोषागारात भरले. उर्वरित सर्व रक्कम वर्षभरात दोन टप्प्यात शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार आहे.

भूसंपादन झालेल्या शेतक-यांनी दाखविलेला संयम, समजदारी आणि भूसंपादन करणाºया यंत्रणांनी दाखविलेले सहकार्य यामुळेच लाभ देणे शक्य झाल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी मनोगतात सांगितले. यशस्वी तडजोड व रक्कम जमा झाल्याबद्दल शेतकºयांनी न्या.सानप तसेच जिल्हा सेवा विधी प्राधीकरणाचे सचीव के.एच.ठोंबरे यांचा सत्कार केला. दरम्यान, मध्यस्थीने अशाप्रकारे २०५ शेतकºयांना भूसंपादन मोबदल्यापोटी एवढी मोठी रक्कम मिळाल्याचे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कार्यक्रमाला जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक कुळकर्णी, अधीक्षक अभियंता आनंद मोरे, पॅनल विधीज्ञ अ‍ॅड शिंदे, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, अ‍ॅड मंजू वाणी, सचिव अ‍ॅड. योगेश गावंडे, शतकºयांच्या वतीने  अ‍ॅड. एन.आर.लाठी, अ‍ॅड.आर.डी.झाल्टे, अ‍ॅड. मनोज पाचपोळ, यांनी काम पाहिले.तापी महामंडळातर्फे अ‍ॅड. देवप्रसाद पाटील यांनी काम पाहिले.

बळीराजांनी केले शासनाला २५ कोटीचे व्याज माफ
सद्यस्थितीत दुष्काळाने शेतकरी होरपळला आहे. सततच्या नापिकी व कर्जाच्या ओझ्याने शेतकरी आत्महत्या करीत असताना, दुसरीकडे मुंदखेडा व पातोंडा येथील शेतकºयांनी १६० कोटींच्या रक्कमेवरील १५ टक्कयांप्रमाणे व्याजाचे २५कोटी माफ करुन आदर्श उभा केला आहे. त्यामुळे शासनाचे २५ कोटी रुपये वाचणार आहे.

Web Title: The farmers will get 38.22 million rupees in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.