अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:01 PM2017-08-22T13:01:44+5:302017-08-22T13:05:04+5:30

चोपडा येथील घटना, चालक वाहनासह फरार, अकस्मात मृत्यूची नोंद

Farmers killed on the spot of an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी जागीच ठार

Next
ठळक मुद्देबैलांना खळ्यात बांधून घरी परतत असतांना झाला अपघातओळख पटत नसल्याने, मृतदेह घटनास्थळी पडूनअकस्मात मृत्यूची नोंद
नलाईन लोकमत चोपडा, जि.जळगाव , दि...२२ :अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, अशोक विठ्ठल बडगुजर (५४) हा शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना २१ रोजी रात्री घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोळ्याच्या दिवशी अशोक बडगुजर (रा. साळीवाडा,चोपडा) यांनी बैल मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यानंतर बैलांना खळ्यात बांधून रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरी परत येत होते. शहरातील नदीकाठालगत असलेल्या आशा टॉकीज ते रामपुरा भागातील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने, ते जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला.दरम्यान शेतकºयाची ओळख पटत नसल्याने, काहीवेळ मृतदेह घटनास्थळी पडून होता. त्याच्या खिशात शालकाचे ओळखपत्र सापडले. त्यावरून नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर शेतकºयाची ओळख पटली. त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, डॉ. नरेंद्र पाटील यांनी वाहनाच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Web Title: Farmers killed on the spot of an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.