जळगावात श्रीराम मंदिर संस्थानच्या वहन स्वागतासाठी भक्तांचा अपूर्व उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:46 PM2018-11-12T12:46:00+5:302018-11-12T12:46:20+5:30

रांगोळ्यांनी सजले मार्ग

Excitement of devotees to the devotees of Shriram temple at Jalgaon | जळगावात श्रीराम मंदिर संस्थानच्या वहन स्वागतासाठी भक्तांचा अपूर्व उत्साह

जळगावात श्रीराम मंदिर संस्थानच्या वहन स्वागतासाठी भक्तांचा अपूर्व उत्साह

Next

जळगाव : ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या रथोत्सवानिमित्ताने आयोजित सिंहाच्या वहनाचे रविवारी ठिकठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. टाळ मृदुंगाचा गजर, वारकऱ्यांकडून सुरू असलेला प्रभू श्रीरामाचा व संत अप्पा महाराजांचा जयजयकार असे अतिशय भक्तीमय वातावरण वहन मार्गावर दिसून आले.
पान सुपारीच्या कार्यक्रमासाठी सिंहाचे वहन सायंकाळी जुन्या जळगावातील श्रीराम मंदिरापासून मार्गस्थ झाले. प्रथम उत्सव मूर्तीची विधीवत पूजा गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्याहस्ते झाली. यानंतर श्रीराम नामाचा जयघोष करत वहनाला सुरुवात झाली. पुढे संत मुक्ताबार्इंच्या पादुकांची पालखी व भारुड व भजनी मंडळी भजन सादर करीत वहन मार्गस्थ होत होते.
श्रीराम मंदिर,भोईटे गल्ली, कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरूण कुढापा चौक, पांझरा पोळ, साठे चौक, संत कंवरलाल चौक, स्वातंत्र्य चौक मू.जे. महाविद्यालयमार्गे वहन विठ्ठल मंदिराजवळ पोहचले. त्यानंतर विनोद पाटील यांच्याकडे पानसुपारी सुपारीचा कार्यक्रम होऊन आरती करण्यात आली. या वेळी विनोद पाटील यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, हेमंत पाटील, भावेश भंगाळे, पिंटू पाटील, अनिल पाटील, जीवन चौधरी, गोपाल काकडे आदी उपस्थित होते. सोबतच ओंकारेश्वर मंदिरामागील डॉ. पंकज पाटील व त्यानंतर ओमप्रकाश जाजू यांच्याकडे पानसुपारीचा कार्यक्रम झाला.
रांगोळ््यांनी वेधले लक्ष
वहन मार्गवर जागोजागी रांगोळ््या काढण्यात आल्या होत्या. पानसुपारी साठी वहन पोहचणार म्हणून यजमानांचेही अंगण रांगोळ््यांनी सजले होते. पानसुपारीसाठी परिसरातील भाविकही मोठ्या उत्साहाने व भावभक्तीने सहभागी झाले होते.
आजच्या वहनाचा मार्ग
श्रीराम मंदिर,भोईटे गल्ली, कोल्हे वाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरूण कुढापा चौक, पांझरा पोळ, साठे चौक, संत कंवरलाल चौक, स्वातंत्र्य चौक मू.जे. महाविद्यालय, गिरणा टाकी परिसर, पोस्टल कॉलनी येथे कैलास भोळे यांच्याकडे पानसुपारीचा कार्यक्रम होईल. याच ठिकाणी उपासनी महाराज यांचे कीर्तनदेखील होणार आहे.

Web Title: Excitement of devotees to the devotees of Shriram temple at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.