जळगावात निवडणूक अधिकाऱ्यांच्या संगनमताने ईव्हीएम घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:37 PM2018-08-14T12:37:57+5:302018-08-14T12:38:39+5:30

१५ पराभूत उमेदवाराची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

EVM scam in Jalgaon election officials jointly | जळगावात निवडणूक अधिकाऱ्यांच्या संगनमताने ईव्हीएम घोटाळा

जळगावात निवडणूक अधिकाऱ्यांच्या संगनमताने ईव्हीएम घोटाळा

Next
ठळक मुद्देप्रभाग १६ ची निवडणूक रद्द करण्याची मागणीप्रभाग १६ ची निवडणूक रद्द करण्याची मागणी

जळगाव : भाजपा उमेदवार व निवडणूक अधिकाºयांच्या संगनमतानेच ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार झाला असल्याचा आरोप करीत प्रभाग १६ ची निवडणूक रद्द करण्याची मागणी प्रभाग १६ मधील सर्वपक्षीय १५ पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मनपा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री प्रभाग १६-ब मधील भाजपा उमेदवार रजनी प्रकाश अत्तरदे यांच्या सुनेच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडीत प्रभाग १६-क मधील भाजपा उमेदवार रेश्मा काळे यांचे पती कुंदन काळे, दीपक चौधरी तसेच अन्य दोन अनोळखी इसम हे सेंट लॉरेन्स स्कूलमधील मतदान केंद्रात शिरले होते. अधिकाºयांनी भाजपा उमेदवारांशी संगनमत केल्यानेच त्यांना आत प्रवेश दिला. तेथे वाहनातील सामान उतरविल्यानंतर चौघे मतदान केंद्रात अधिकाºयांसह गेले. तेथे सुमारे १०-१५ मिनिटे हे सर्वजण होते. हे अमोल अशेक कोल्हे यांनी पाहिले. त्यांनी आयुक्त, तसेच इतर उमेदवारांना कळविली. मात्र उच्च पदस्थ अधिकारी फिरकलेच नाहीत. तसेच राष्टÑवादीच्या उमेदवार प्रिया अमोल कोल्हे यांना धक्काबुक्की झाल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यावर व अमोल कोल्हे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यावर केवळ मतदान केंद्रावरील कर्मचारी बदलण्यात आले.
इव्हीएम मशिन बदलण्यात आले नाहीत. त्यामुळे कुंदन काळे, दीपक चौधरी व अन्य दोन व्यक्तींनी निवडणूक अधिकाºयांशी संगनमत करून ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा तसेच भाजपा उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखविल्याचा आरोप करून प्रभाग १६ ची निवडणूक रद्द करण्याची मागणी चेतन शिरसाळे , प्रिया कोल्हे , सुरेशकुमार कुकरेजा , साधना श्रीश्रीमाळ, भरत बाविस्कर , रेखा भालेराव (काँग्रेस), संजय तायडे (अपक्ष), सुरेखा तायडे (अपक्ष), खुबचंद साहित्या (शिवसेना), जानकीबाई साहित्या (शिवसेना), मनोज चौधरी (काँग्रेस), सचिन जोशी (अपक्ष), मोहम्मद इकबाल अब्दुल सत्तार (सपा), खुशाल शर्मा (हिंदू महासभा), पारूबाई मोरे (अपक्ष) या पराभूत उमेदवारांनी केली आहे.

Web Title: EVM scam in Jalgaon election officials jointly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.