लग्नाची मेहंदी पुसण्यापूर्वीच नव विवाहीत तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:10 PM2019-05-22T12:10:57+5:302019-05-22T12:11:37+5:30

एक तरूण गंभीर जखमी

Even before marrying a henna of marriage, the newly married couple killed in the accident | लग्नाची मेहंदी पुसण्यापूर्वीच नव विवाहीत तरुण अपघातात ठार

लग्नाची मेहंदी पुसण्यापूर्वीच नव विवाहीत तरुण अपघातात ठार

Next

जळगाव : लग्न आटोपून घरी परतणाऱ्या तरूणांच्या दुकचाीला भरधाव बँन्डच्या वाहनाने समोरून धडक दिली़ या अपघातामध्ये महेंद्र शिवाजी पाटील (वय-२९, रा़ कुसंूंबा) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर सागर प्रकाश पाटील (वय-२४) हा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९़३० वाजता शिरसोली रस्त्यावरील श्रीकृृष्ण लॉन्ससमोर घडली़ दरम्यान, महेंद्र याचा आठ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता़
तालुक्यातील वावडदा येथील ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील यांच्या मुलीचा मंगळवारी सायंकाळी विवाह होता़ त्यामुळे महेंद्र आणि त्याचा मित्र सागर हे दोघे एमएच़१९़एके़ २६८१ क्रमांकाच्या मोटारसायकलीने लग्नाला गेले होते. सायंकाळी लग्न सोहळा आटोपून दोघेही घरच्या मार्गाला निघाले़ शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण लॉन्सजवळ समोरुन जात असताना त्यांच्या मोटारसायकलीला समोरून येणाºया भरधाव बँन्डच्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र याच्या डोक्याला आणि चेहºयाला जबर मार बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर सागर हा गंभीर जखमी झाला.
नागरिकांची घटनास्थळी धाव
दोन्ही वाहनांच्या अपघाताचा मोठा आवाज झाल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना दोन तरूण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले़ नंतर काहींनी एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी सचिन देशमुख, सिध्दार्थ लटपटे यांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठले़ अखेर पोलिसांनी मयताच्या व जखमीच्या जवळ मिळून आलेल्या मोबाईलवरून त्यांची ओळख पटण्यास मदत झाली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने रिक्षातून मृतदेह व जखमी रूग्णालयात नेण्यात आले़ जखमी सागर याला खाजगी रूग्णालयात नेण्यात आले़
अपघातानंतर बँन्डचे वाहन फरार
दुचाकीला धडक दिल्यानंतर बँन्डचे वाहन हे पसार झाले़ नागरिकांनी वाहनास पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र ते वाहन शिरसोलीच्या दिशेने पसार झाल्याचे नागरिकांनी सांगितले़ तसेच संतकृपा बँन्ड नावाचे ते वाहन असल्याचेही नागरिकांनी सांगितले़ रात्री जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करीत हळहळ व्यक्त केली़
आठ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
महेंद्र हा कुसुंबा गावात दुधाचा व्यवसाय करीत होता. आठ दिवसांपूर्वीच त्याचा विवाह झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच त्याच्या कुटुंबियांनी रुग्णलयात धाव घेवून आक्रोश करीत हंबरडा फोडला़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मोठा भाऊ, वहीणी असा परिवार आहे. तर जखमी सागर हा चटईच्या कंपनीत कामाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह वावडदा येथील मित्रमंडळींची देखील प्रंचड गर्दी झालेली होती़

Web Title: Even before marrying a henna of marriage, the newly married couple killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव