जिओ टॅगींग मध्येही एरंडोल तालुका पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:20 AM2018-03-21T11:20:33+5:302018-03-21T11:20:33+5:30

‘जलयुक्त शिवार’चा घोळ

 Erandol taluka trailing in Geo-tagging too | जिओ टॅगींग मध्येही एरंडोल तालुका पिछाडीवर

जिओ टॅगींग मध्येही एरंडोल तालुका पिछाडीवर

Next
ठळक मुद्दे टॅगिंगअभावी निधी खर्ची पडण्यात येणार अडचणी आतापर्यंत ७५.६८ टक्के जिओ टॅगींगचे काम पूर्ण अद्यापही सुमारे २४.३२ टक्के काम अपूर्ण

जळगाव: जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोनमधील कामांचे जिओ टॅगींगचे कामही ७५.६८ टक्केच पूर्ण झाले आहे. अद्यापही सुमारे २४.३२ टक्के काम अपूर्ण आहे. त्यातही एरंडोल तालुका पिछाडीवर असून केवळ ५२.८२ टक्केच काम पूर्ण झाले आहे. जिओ टॅगिंगअभावी बिले मंजूर होणार नसल्याने निधी खर्ची पडण्यातही अडचण येणार आहे.
निधी खर्ची पडण्यात अनेक अडचणी
विविध विभागाच्या स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या दूर्लक्षामुळे या जलयुक्तच्या दुसºया टप्प्याच्या कामांचे जिओ टॅगिंग पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधीत मक्तेदाराला बिल मिळूच शकणार नाही. त्यामुळे मार्च १८ अखेर ही कामे अपूर्ण राहून निधी परत गेल्यास आता शेवटी-शेवटी घाई-गर्दीत पूर्ण होणाºया कामांनाही जिओ टॅगींग नसल्याने बिल मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ७५.६८ टक्के जिओ टॅगींगचे काम पूर्ण झाले आहे. कृषी विभागाने जिओ टॅगिंगचे काम ८६.८२ टक्के , लघुसिंचन जि.प.ने ९०.२३, लघुसिंचन जलसंधारणने ८७.७९, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रनेने ८४.५७ टक्के, महात्मा गांधी ग्रामीण रोहयो जि.प.ने ३०.३७ टक्के तर वनविभागाने ९१.२७ टक्के काम पूर्ण केले आहे. जि.प. रोहयो विभागाचे काम सर्वात मागे आहे.
एरंडोल तालुका पिछाडीवर
जिल्ह्यात टप्पा दोनसाठी आॅनलाईन प्रणालीवर नोंद केलेल्या प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांची संख्या ४७०४ असून कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांची संख्या ४६३९ आहे. म्हणजेच प्रशासकीय मान्यता मिळूनही व काम पूर्ण करण्याची वाढीव मुदत संपायला आली तरीही ६५ कामांना कार्यादेशच देण्यात आलेले नाहीत अथवा त्याची नोंद आॅनलाईन प्रणालीवर नाही. त्यापैकी आॅनलाईन प्रणालीवर जिओ टॅगींग झालेल्या कामांची संख्या ३५६० असून त्याची टक्केवारी ७५.६८ टक्के आहे. एरंडोल तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी ५२.८२ टक्केच जिओ टॅगिंगचे काम झाले आहे. त्यापाठोपाठ बोदवड ५४.१५, मुक्ताईनगर ५६.७७, धरणगाव ६५.५५, जामनेर ६५.०३ या तालुक्यांचा समावेश आहे.

Web Title:  Erandol taluka trailing in Geo-tagging too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.