मुक्ताईनगर नगरपंचायतीवर एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:55 PM2018-07-20T12:55:21+5:302018-07-20T13:00:21+5:30

भाजपा नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवित १७ पैकी १३ जागा मिळविल्या आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी ह्या ११७५ मतांनी विजयी झाल्या. शिवसेनेला ३ आणि एक जागा अपक्षाने मिळविली आहे.

Eknathrao Khadse dominated the Muktainagar Nagar Panchayat | मुक्ताईनगर नगरपंचायतीवर एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व

मुक्ताईनगर नगरपंचायतीवर एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीत १७ पैकी १३ जागांवर भाजपा विजयीनगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी विजयीशिवसेनेला ३ तर अपक्षाला एक जागा

जळगाव - भाजपा नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवित १७ पैकी १३ जागा मिळविल्या आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी ह्या ११७५ मतांनी विजयी झाल्या. शिवसेनेला ३ आणि एक जागा अपक्षाने मिळविली आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली. पहिल्या दहा मिनिटातच भाजपाच्या दोन उमेदवारांनी विजयी सलामी दिली. यानंत भाजपाने विजयी घौडदौड कायम ठेवली. विशेष म्हणजे सहा जागांवर भाजपाचे मुस्लीम उमेदवार निवडून आले आहेत.
विजयी उमेदवारांची नावे व कंसात त्यांना मिळालेली मते अशी आहेत.
भाजपा - संतोष प्रल्हाद कोळी (२४६), शबानाबी अब्दुल आरीफ (३८९), बिल्कीसबी अमानुल्ला खान (३२४), शमीम अहमद खान (२४३), मुकेश कैलास वानखेडे (४३५), पियुष भागवत मोरे (४००), साधना हरिश्चंद्र ससाणे (४७९), बिल्कीसबी आसीफ बागवान (२८४), शेख शकील शेख शकुर खाटीक (२३८), मस्तान इमाम शेख (३६२), कुंदा अनिल पाटील (६०९), नीलेश प्रभाकर शिरसाळे (३३१), मनिषा प्रविण पाटील (३६०)

शिवसेना - संतोष सुपडू मराठे (४११), राजेंद्र सुकदेव हिवराळे (४६७), सविता सुभाष भलभले .
अपक्ष - नुसरत बी. मेहमुब खान (३३३),

प्रभाग क्र. ११ मध्ये भाजपाचे शेख मस्तान यांंंना ३६२ तर अपक्ष जफर अली नजीर अली यांना ३६० मते मिळाली. जफर अली यांच्या मागणीनुसार पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यात शेख मस्तान हे विजयी उमेदवार कायम राहिले. दुसरीकडे प्रभाग क्र. १४ मध्येही अपक्ष शीतल सापधरे यांना ३९५ तर शिवसेनेच्या सविता सुभाष भलभले यांना ३९२ मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते. भलभले यांच्या मागणीनुसार या प्रभागातही पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यात सविता भलभले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचा फायदा झाला.


पक्षीय बलालब
एकूण जागा -१७
भाजपा -१३
शिवसेना- ३
अपक्ष -१

Web Title: Eknathrao Khadse dominated the Muktainagar Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.