खानापूर येथे युवकाला पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:30 PM2018-06-29T12:30:24+5:302018-06-29T13:23:30+5:30

गुरांच्या वाड्यात होता झोपलेला

Efforts to kill the youth in Khappur by throwing petrol | खानापूर येथे युवकाला पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न

खानापूर येथे युवकाला पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देसावदा येथील खासगी रुग्णालयात उपचार परिसरात खळबळ

रावेर, जि. जळगाव - तालुक्यातील खानापूर येथील स्टेशनरोडनजीक असलेल्या प्लॉटवस्तीत गुरांच्या रखवालीसाठी झोपलेल्या संदीप अशोक धांडे (वय २२) या तरुणाच्या अंगावर दोन अज्ञात इसमांनी पेट्रोलमिश्रीत रॉकेल ओतून पेटवून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये युवक ३५ टक्के भाजला असून सावदा येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली
खानापूर येथील युवक संदीप धांडे हा रेल्वेमार्गालगतच्या गावाबाहेरील वाड्यात गुरांची रखवाली करण्यासाठी झोपला होता. वाड्यातील सुरू असलेला बल्ब काढून दोन अज्ञात इसमांनी त्याच्या अंगावर पेट्रोल मिश्रीत रॉकेल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली.
दरम्यान, आगीमुळे विव्हळत संदीप अशोक धांडे याने बाहेर धाव घेतली असता बाहेर उभा असलेल्या एका अज्ञात इसमाने घटनास्थळावरून धूम ठोकल्याची चर्चा आहे. जळीत संदीपची मदतीची याचना व आरडाओरडा ऐकून शेजारच्या मंडळींनी धाव घेत आग विझविली व त्यास सावदा येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सावदा पोलिसांनी जबाब घेतला.

Web Title: Efforts to kill the youth in Khappur by throwing petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.