पारोळा तालुक्यात २७ गावांना तीव्र पाणी टंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 05:44 PM2018-03-18T17:44:29+5:302018-03-18T17:44:29+5:30

पारोळा तालुक्यातील सर्वच छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला असून २७ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. यामुळे १२ गावांना टँकर तर १२ गावांना विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, ३ गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे.

Due to water scarcity of 27 villages in Parola taluka | पारोळा तालुक्यात २७ गावांना तीव्र पाणी टंचाईचे चटके

पारोळा तालुक्यात २७ गावांना तीव्र पाणी टंचाईचे चटके

Next
ठळक मुद्देफक्त बोरी धरणातून टँकर भरण्याची व्यवस्थासहा प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लकग्रामस्थांची पाण्यासाठी शेतांकडे धाव

लोकमत आॅनलाईन
पारोळा, दि.१८ : तालुक्यातील वडगांव प्र अ, हिवरखेडे, कंकराज, सांगवी, मोंढाळे े(पिंपळभैरव) पोपटनगर, मोहाडी दहिगाव, रत्नापिंप्री, मंगरुळ, खेडीढोक, मेहु, टेहू, या १२ गावांना ४ शासकीय, २ खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर जोगलखेड तांडा, हनुमंतखेडे, पुनगाव, या तीन गावांमधून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरची मागणी केली जात आहे, तसा प्रस्ताव उपविभागीय पाणी पुरवठा भाग (अमळनेर) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
१२ गावांना विहिरी अधिग्रहित
तालुक्यात एकूण १२ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी खाजगी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यात जिराळी, आंबापिंप्री, शेळावे खुर्द, राजवड, लोणी खुर्द, इंधवे, महाळपूर,कराडी,पळासखेडे, रामनगर, नेरपाट, भिलाली या गावांचा समावेश असून तेथील ग्रामस्थांना तुर्त काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात अनेक छोट्या- मोठ्या गावांना कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ बसत असून या समस्येवर मात करण्यासाठी शासकीय उपायांची वाट न पाहता ग्रामस्थ दररोज बैलगाडी, लोटगाडी, दुचाकी, सायकलवर ड्रम किंवा टाक्या ठेऊन शेतांमधून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. यात मुंदाणे प्र अ, पोपटनगर या दोन गावांचा प्रामुख्याने समावेश आहे.
एप्रिल आणि मे हे तीव्र उन्हाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असून ग्रामीण भागातील जनतेला त्यांना तोंड द्यायचे आहे.
प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज
तालुक्यात फक्त बोरी धरणात टँकर भरण्याची तेवढी व्यवस्था आहे . पण उर्वरित भोकरबारी, कंकराज, इंदासी, शिरसमणी, खोलसर, सावरखेडे या सर्व धरणात मृत साठा तेवढा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात पाणी टंचाईची स्थिती कोणते वळण घेते याबाबत सर्वच स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने तातडीने उपाययोजनांबाबत पावले उचलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.



 

Web Title: Due to water scarcity of 27 villages in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी