मोबाईल दिला नाही म्हणून जळगावातील बालकाने सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:02 PM2018-06-02T17:02:11+5:302018-06-02T17:02:11+5:30

मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़

Due to not providing mobile, the child from Jalgaon left | मोबाईल दिला नाही म्हणून जळगावातील बालकाने सोडले घर

मोबाईल दिला नाही म्हणून जळगावातील बालकाने सोडले घर

Next
ठळक मुद्देकांचननगरातील घटनातीन दिवस उलटूनही बालक सापडेनाकुटुंबियांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२ - मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, तीन दिवस उलटून सुध्दा मुलगा आढळून न आल्याने अखेर कुटुंबीयांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला़
संजीवदास बैरागी हे कांचननगर येथे वास्तव्यास असून सुधाशांती येथे कामाला आहेत़ गुरूवारी ३१ मे रोजी त्यांचा मुलगा रितेश हा ११ वाजता पायाला दुखापत झाल्यामुळे उपचार घेऊन घरी परतला़ त्यानंतर त्याने खेळण्यासाठी मोबाईल हवा असा हट्ट धरला़ मात्र, जेवणानंतरच मोबाईल मिळेल असे आईने सांगितले़ याचाच राग येऊन दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास रितेशने काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेला़ मुलगा रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे आईच्या लक्षात येताच त्यांनी संजीवदास यांना कळविले़ त्यानंतर मुलाचा कानळदा, पाळधी, भुसावळ यासह अनेक भागांमध्ये त्याचा शोध घेतला़ मात्र, तो मिळून आला नाही़ यानंतर संजीवदास यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनला मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली आहे़

Web Title: Due to not providing mobile, the child from Jalgaon left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.